घरदेश-विदेशगुजरातमध्ये हाहा:कार...! 71 दिवसांत 1.23 लाख मृत्यू

गुजरातमध्ये हाहा:कार…! 71 दिवसांत 1.23 लाख मृत्यू

Subscribe

सरकारी आकडा मात्र 4 हजार

कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस देशात मृत्यूचा आकडा वाढत आहे. एकट्या गुजरातमध्ये हाहा:कार उडाला असून अहमदाबाद, सूरत, राजकोट, भावनगर, जामनगर यांसारख्या जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होत चालली असून मृत्यूदर देखील वाढताना दिसत आहे. कोरोना रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शवगृहात मृतदेहांची रांग लागली असल्याचे सांगितले जात असून भाजपप्रणित गुजरात सरकारकडून मात्र मृतांचा खरा आकडा लपविण्यात येत आहे. गुजरातमधील 1 मे ते 10 मेपर्यंतच्या मृत्यू प्रमाणपत्राची माहिती घेतली असता धक्कादायक आकडेवाडी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये 71 दिवसांत 1 लाख 23 हजार 871 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सरकारी आकडेवाडीनुसार कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या फक्त 4 हजार 218 एवढीच दाखवण्यात येत आहे. त्यामुळे, 71 दिवसांत सव्वा लाख लोकांचा जीव कसा गेला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील मृत्यू प्रमाणपत्रांच्या आकडेवारीनुसार यंदाच्या मार्च महिन्यातच 26 हजार 26, एप्रिल महिन्यात 57 हजार 796 आणि मे महिन्याच्या सुरुवातीच्या 10 दिवसांत 40 हजार 41 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीसोबत यंदाची तुलना केल्यास मोठी तफावत जाणवते. मार्च 2020 मध्ये 23 हजार 352, एप्रिलमध्ये 21 हजार 591 आणि मे 2020 मध्ये 13 हजार 125 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 71 दिवसांत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दुप्पट असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस देशात मृत्यूचा आकडा वाढत आहे. एकट्या गुजरातमध्ये हाहा:कार उडाला असून अहमदाबाद, सूरत, राजकोट, भावनगर, जामनगर यांसारख्या जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होत चालली असून मृत्यूदर देखील वाढताना दिसत आहे. कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शवगृहात मृतदेहांची रांग लागली असल्याचे सांगितले जात असून भाजपप्रणित गुजरात सरकारकडून मात्र मृतांचा खरा आकडा लपविण्यात येत आहे. गुजरातमधील 1 मे ते 10 मेपर्यंतच्या मृत्यू प्रमाणपत्राची माहिती घेतली असता धक्कादायक आकडेवारीसमोर आली आहे. या आकडेवारीनुसार, राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये 71 दिवसांत 1 लाख 23 हजार 871 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सरकारी आकडेवारीनुसार कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या फक्त 4 हजार 218 एवढीच दाखवण्यात येत आहे. त्यामुळे, 71 दिवसांत सव्वा लाख लोकांचा जीव कसा गेला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील मृत्यू प्रमाणपत्रांच्या आकडेवारीनुसार यंदाच्या मार्च महिन्यातच 26 हजार 26, एप्रिल महिन्यात 57 हजार 796 आणि मे महिन्याच्या सुरुवातीच्या 10 दिवसांत 40 हजार 41 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीसोबत यंदाची तुलना केल्यास मोठी तफावत जाणवते. मार्च 2020 मध्ये 23 हजार 352 एप्रिलमध्ये 21 हजार 591 आणि मे 2020 मध्ये 13 हजार 125 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 71 दिवसांत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दुप्पट असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -