घरमहाराष्ट्रलॉकडाऊनमुळे रुग्णसंख्येत घट

लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्येत घट

Subscribe

मात्र अपुर्‍या सोईसुविधेमुळे मृत्यू कायम

मार्चपासून कोरोनाने थैमान घातल्याने 15 एप्रिलपासून राज्यामध्ये लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊन केल्याचे परिणाम आता समोर येऊ लागले आहे. लॉकडाऊन केल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मात्र बाधित रुग्णांना ऑक्सिजन किंवा रेमडेसिवीर इंजेक्शन वेळेत मिळत कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येत असले तरी अपुर्‍या सोईसुविधेमुळे मात्र रुग्णांचे प्राण दगावत आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा आलेली कोरोनाची लाट ही प्रचंड मोठी आहे. या लाटेमध्ये राज्यातील आरोग्यसेवेचे पूर्णत: तीनतेरा वाजले. मार्चच्या सुरुवातीपासून राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली, तर एप्रिलमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सर्वाधिक उद्रेक पाहायला मिळाला. कोरोना रुग्ण व मृतांनी गतवर्षीचे सर्व विक्रम मोडीत काढले. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला.

- Advertisement -

रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकूनही अनेक ठिकाणी इंजेक्शन व ऑक्सिजन खाटा मिळत नव्हत्या. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वेगाने वाढ झाली. दररोज 300 ते 400 जणांचा मृत्यू होत असताना 30 एप्रिलला रुग्णांच्या मृत्यूची संख्येने थेट 985 चा आकडा गाठला. जो आतार्यंतच सर्वाधिक मृत्यूचा आकडा समजला जातो. त्यानंतरही राज्यातील मृत्यूंची संख्या सातत्याने 700 ते 800 च्या घरात आहे. त्यामुळे रुग्णांचे मृत्यू रोखण्यात अद्यापही सरकारला अपयश येताना दिसून येत आहे.

राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकारने 15 एप्रिलपासून राज्यामध्ये कडक निर्बंध लादत लॉकडाऊन जाहीर केले. या लॉकडाऊनचा परिणाम एप्रिलमध्ये फारसा जाणवला नसला तरी मे महिन्याच्या सुरुवातीपासून लॉकडाऊनचा परिणाम दिसून येऊ लागले आहेत. एप्रिलमध्ये कोरोनाच्या लाटेचा उद्रेक झाला असताना राज्यामध्ये सातत्याने 65 ते 68 हजारांच्या दरम्यान कोरोनाचे रुग्ण दररोज सापडत होते. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासून यामध्ये मोठी घट झालेली पाहायला मिळत आहेत.

- Advertisement -

मागील दोन दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 40 हजारांच्या घरात आली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी मृतांच्या संख्येचा उद्रेक मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे. कोरोना रुग्ण संख्येत घट होत असताना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये 50 ते 60 हजारांच्या घरात असलेली बरे होणारी रुग्ण संख्या 70 हजाराच्या घरात गेली आहे. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. राज्यामध्ये सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यामध्ये 95 हजार 731 असून, त्याखालोखाल नागपूर 53 हजार 20, मुंबई 40 हजार 162, ठाणे 31 हजार 446, नाशिक 26 हजार 806, अहमदनगर 26 हजार 591, सातारा 22 हजार 987, सांगली 20 हजार 499 इतके अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

बाधित रुग्ण मृत्यू बरे झालेले
18 एप्रिल 68,631 503 45,654
19 एप्रिल 58,924 351 52,412
20 एप्रिल 62,097 519 54,224
21 एप्रिल 67,468 568 54,985
22 एप्रिल 67,013 568 62,298
23 एप्रिल 66,836 773 74,045
24 एप्रिल 67,160 676 63,818
25 एप्रिल 66,191 832 61,450
26 एप्रिल 48,700 524 71,736
27 एप्रिल 66,358 895 67,792
28 एप्रिल 63,309 985 61,181
29 एप्रिल 66,159 771 68,537
30 एप्रिल 62,919 828 69,710
1 मे 63,282 802 61,326
2 मे 56,647 669 51,356
3 मे 48,621 567 59,500
4 मे 51,880 891 65,934
5 मे 57,640 920 57,006
6 मे 62,194 853 63,842
7 मे 54,022 898 37,386
8 मे 53,605 864 82,266
9 मे 48,401 572 60,226
10 मे 37,326 549 61,607
11 मे 40,956 793 71,966

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -