घरCORONA UPDATECorona Vaccination : लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर; चार कोटी लस मात्रांचा टप्पा पार

Corona Vaccination : लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर; चार कोटी लस मात्रांचा टप्पा पार

Subscribe

पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ३ कोटी ६ लाख ९९ हजार ३३९ इतकी आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर आहे. महाराष्ट्राने पुन्हा विक्रम प्रस्थापित करत लस मात्रांचा चार कोटींचा टप्पा पार केला आहे. मंगळवारी (आज) दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्यात आतापर्यंत ४ कोटी २४ हजार ७०१ लसींचे डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली आहे.

देशामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असून आज दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्याने आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या चार कोटींवर गेली. त्यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ३ कोटी ६ लाख ९९ हजार ३३९, तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ९३ लाख २५ हजार ३६२ इतकी आहे. आज दुपारपर्यंत राज्यात एक लाख २० हजार नागरिकांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत हा आकडा वाढू शकेल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या माहितीनुसार, झायडस कॅडिलाची लस येत्या ऑगस्टमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या कंपनीने गेल्या १ जुलैला याबाबतची माहिती दिली होती. झायडस कॅडिलाने १२ ते १८ वर्षे वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीची निर्मिती केली आहे. या लसीच्या क्लिनिकल ट्रायल नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पुढील ४५ ते ६० दिवसात ही लस उपलब्ध होऊ शकेल. ही लस भारतीय औषध महानियंत्रकांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -