घरमहाराष्ट्रराज्यात १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण

राज्यात १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण

Subscribe

२७४ केंद्रांवर करण्यात आले लसीकरण

राज्यात आज २७४ केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. सायंकाळी सातपर्यंत १४ हजार ८८३ (५२.६८ टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली असून काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत लसीकरण सुरु होते. लस घेतल्यानंतर गंभीर प्रतिकुल परिणाम झाल्याची घटना झाली नसून उद्या देखील लसीकरण सत्र आयोजित करण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

राज्यात शनिवारी ३४ जिल्हे आणि २७ महापालिका क्षेत्रामध्ये लसीकरणाचे सत्र सुरु झाले असून कोविन पोर्टलवर १७ हजार ७६२ व्हॅक्सीनेटर्स आणि ७ लाख ८५ हजार ९२७ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी नऊ वाजेपासून लसीकरणाला सुरुवात झाली.

- Advertisement -

सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात लसीकरण झालेले कर्मचारी) : अकोला (१८१), अमरावती (२३९), बुलढाणा (३५९), वाशीम (२१२), यवतमाळ (२८९), औरंगाबाद (३३५), हिंगोली (१२०), जालना (२३१), परभणी (२२९), कोल्हापूर (५४५), रत्नागिरी (२४५), सांगली (४३२), सिंधुदूर्ग (१६१), बीड (१४२), लातूर (२२१), नांदेड (२७६), उस्मानाबाद (२३८), मुंबई (५९५), मुंबई उपनगर (१००२), भंडारा (२०६), चंद्रपूर (३९९), गडचिरोली (१८९), गोंदिया (१४४), नागपूर (६५६), वर्धा (३८६ टक्के), अहमदनगर (६५०), धुळे (३१३), जळगाव (३९७), नंदुरबार (२८५), नाशिक (७१०), पुणे (१४०३), सातारा (५११), सोलापूर (६८१), पालघर (३१९), ठाणे (१४३४), रायगड (१५०)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -