अभिनेता आशुतोष भाकरे याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या करून आपले जीवन संपवले होते. त्याची पत्नी अभिनेत्री मयुरी देशमुख हिने पतीच्या मृत्यूनंतर आज, मंगळवारी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तिने आशुतोषच्या वाढदिवसानिमित्त केक बनवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आशुतोष भाकरे याने २९ जुलै रोजी नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आशुतोषने नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचे बोलले जात होते. आज मयुरीने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे मयुरीची पोस्ट
आशुड्या,
मी या लॉकडाउनमध्ये केवळ तुझ्या वाढदिवसासाठी सर्वोत्कृष्ट केक बनवण्यासाठी ३० वेळा केक बनवले. त्या सर्वच्या सर्व केकचा पहिला घास तुला भरवला होता. पण ते ३० केक तुझा वाढदिवस आधीच साजरा करण्याचा आपला मार्ग होता का? तुझ्या जाण्याने खुप सारे प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत.
मला माहित आहे की तुझे कृत्य भ्याडपणाचे नव्हते, ती उदासीनतेविरोधात तुझी दीर्घकाळ चाललेली लढाई होती. अखेर असहायतेमुळे तू ते टोकाचे पाऊल उचलले. पण गुणी बाळ माझं ते…, आपण नैराश्याच्या विरोधातील लढाईत जिंकण्याच्या अगदी जवळ आलो होतो. तू त्यासाठी खुप मेहनतही घेतली होती. फक्त काही काळाचा अवधी हवा होता…
दररोज, प्रत्येक सेकंदाला आपण थोडेसे धैर्य, थोडे अधिक धैर्य आणि एक दीर्घ निरोगी आनंदी आयुष्य तुझी वाट बघत होते… आपल्यासाठी…
तू मला अर्ध्या वाटेवर सोडून गेलास म्हणून मला वेड लागावे की माझ्यासोबत ते क्षण घालवले म्हणून कृतज्ञ असावे? याचा काही फरक पडत का?
तुझ्या आत्म्यास शांती मिळो, अशी प्रार्थना आम्ही सगळेच करत आहोत, यात देवदूताचे तू ऐक, तुझा हट्टी स्वभाव तिथे दाखवू नको…
मी, अभि, मम्मी, पप्पा तुझ्यावर खुप प्रेम करतो….
तू त्रासात असतानाही माझ्यावर अपार प्रेम केलेस…, मी त्याची परतफेड करण्याचा कायम प्रयत्न करेन,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!