घरताज्या घडामोडीकोरोनाच्या भीतीमुळे अवयवदानात तिप्पटीने घट

कोरोनाच्या भीतीमुळे अवयवदानात तिप्पटीने घट

Subscribe

मार्च ते जुलैदरम्यान फक्त १० जणांनीच अवयवदान केले असून, त्यातून २७ जणांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे यंदा अवयवदानालाही कोरोनाचा फटका बसल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. परंतु कोरोनाच्या काळामध्ये अवयवदानामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. गतवर्षी मुंबईमध्ये मार्च ते जुलैदरम्यान ३३ जणांनी केलेल्या अवयवदानातून १०५ जणांना जीवदान मिळाले होते. यावर्षी मार्च ते जुलैदरम्यान फक्त १० जणांनीच अवयवदान केले असून, त्यातून २७ जणांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे यंदा अवयवदानालाही कोरोनाचा फटका बसल्याचे दिसून येत आहे.

शस्त्रक्रियेवर परिणाम

मुंबईमध्ये सध्याच्या घडीला ३९६९ जण अवयव दानाच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये मूत्रपिंडाची आवश्यकता सर्वाधिक म्हणजे ३५३६ व्यक्तींना आहे. त्याखालोखाल ३५० जण यकृत दात्याच्या प्रतीक्षेत असून, २७ जणांना हृदय, १४ जणांना फुफ्फुस, १० जणांना स्वादूपिंड आणि तीन जणांना हाताची प्रतीक्षा आहे. अवयवदानामध्ये वाढ व्हावी यासाठी दरवर्षी मुंबई झोनल ट्रान्सप्लांट को ऑर्डिनेशन सेंटरतर्फे जनजागृती करण्यात येते. या जनजागृतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र यंदा मार्चपासून सुरू झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका अवयवदान मोहीमेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. कोरोना काळामध्ये अवयव दान होऊ शकते का याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्याचबरोबर अवयव प्रत्यारोपण करण्यात येणार्‍या व्यक्तीला आणि शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण होण्याची भीती यामुळे अनेक हॉस्पिटलकडून अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कोरोनाच्या कालावधीत अवयव दानाची प्रक्रिया कमी झाल्या. मात्र आरोग्य विभागाने अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या. सूचनांचे काटेकोर पालन करून शस्त्रक्रिया यशस्वीपणे करता येत असल्याचे लक्षात आल्यानंतर अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यातूनच मार्च ते जुलै २०२० दरम्यान तब्बल १० जणांनी अवयव दान केले असून, त्यातून २७ जणांना जीवदान मिळाली असल्याची माहिती झेडटीसीसीचे मुंबई अध्यक्ष एस. के. माथूर यांनी दिली. दरम्यान मार्च ते जुलै २०१९ दरम्यान ३३ जणांनी अवयवदान केले असून, तब्बल १०५ जणांना जीवदान मिळाले आहे. यामध्ये ५९ जणांना मूत्रपिंड, २८ जणांना यकृत, १२ जणांना हृदय, ६ जणांना फुफ्फुस, मिळाले होते.

- Advertisement -

मार्च ते जुलैमधील अवयव प्रत्यारोप

अवयव २०१९ २०२०
मूत्रपिंड ५९ १५
यकृत २८ १०
हृदय १२
फुफ्फुस  –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -