घरCORONA UPDATECoronavirus Breaking: औरंगाबादमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू

Coronavirus Breaking: औरंगाबादमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यातील घाटी रुग्णालयात आज एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ५२ वर्षीय या रुग्णावर उपचार सुरु होते, आजच या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोनासोबतच या रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब याचाही त्रास होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही. कुलकर्णी यांनी दिली आहे.

औरंगाबाद शहरातील जलाल कॉलनी परिसरात राहणाऱ्या सदर रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास बाधितांचा आकडा ६९० वर येऊन ठेपला आहे. आज रविवारी एकूण ५५ रुग्णांची वाढ झाली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -