घरCORONA UPDATECoronavirus Update: चिंताजनक; राज्यात आज १३९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

Coronavirus Update: चिंताजनक; राज्यात आज १३९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

Subscribe

आज राज्यात २४३६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,२२९ झाली आहे. राज्यात आज एकूण ४२,२१५ Active रुग्ण आहेत. तर आज राज्यात १३९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत एका दिवसातील ही सर्वाधिक मृत्यू झालेली संख्या आहे.

मृत्यू झालेल्यांचा तपशील

मुंबई ५४, ठाणे ३०, वसई विरार १, कल्याण डोंबवली ७, भिवंडी १, जळगाव १४, नाशिक २, मालेगाव ८, पुणे १४, सोलापूर २, रत्नागिरी ५, औरंगाबाद १ असे मृत्यू आहेत. मृत्यूंपैकी ७५ पुरुष तर ६४ महिला आहेत. १३९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७८ रुग्ण आहेत तर ५३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १३९ रुग्णांपैकी ११० जणांमध्ये ( ७९ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृत्यूपैकी २७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २१ एप्रिल ते २ जूनदरम्यानचे आहेत. या कालावधीतील ११२ मृत्यूंपैकी मुंबई ४१, जळगाव १३, ठाणे ३०, कल्याण डोंबिवली ७, मालेगाव ८, रत्नागिरी ५, पुणे ३, भिवंडी १, सोलापूर २, नाशिक २ असे मृत्यू आहेत.

- Advertisement -

कोविड१९ निदानासाठी सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५,२२,९४६ नमुन्यांपैकी ८०,२२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे प्रयोगशाळा चाचण्यांचे दर दशलक्ष प्रमाण ३८२७ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २८३२ इतके आहे.

राज्यात सध्या कंटेनमेंट ३४७९ झोन क्रियाशील असून आज एकूण १८,०२६ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६९.१८ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ५,४५,९४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२,३७५ खाटा उपलब्ध असून सध्या ३०,२९१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -