घरCORONA UPDATECoronavirus Update: राज्यात आज सर्वाधिक १,२३३ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण रुग्ण १६,७५८

Coronavirus Update: राज्यात आज सर्वाधिक १,२३३ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण रुग्ण १६,७५८

Subscribe

राज्यात बुधवारी तब्बल १२३३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतचा राज्यातील हा सर्वाधिक आकडा असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक ९५६ रुग्ण सापडले आहेत. तसेच२७५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत ३०९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असताना बुधवारी राज्यात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. राज्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णांनी एक हजारांचा आकडा पार केला. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक ९५६ रुग्ण सापडले. मुंबईतील हॉटस्पॉट समजल्या जाणाऱ्या तब्बल ६८ नवे रुग्ण सापडले तर माहिममध्ये ११ रुग्ण सापडले आहेत. मुंबईतील ही वाढती संख्या चिंतेची बाब ठरत आहे.

- Advertisement -

राज्यात ३४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृतांची संख्या ६५१ वर पोहचली आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक २५ मृत्यू मुंबईमध्ये झाले आहेत. पुण्यातील ३ , अकोला शहरात ३, जळगाव शहरात १ तर सोलापूर शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे. मृतांमध्ये २१ पुरुष तर १३ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील १८ रुग्ण आहेत तर १३ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. ३४ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये ( ७९ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,९०,८७९ नमुन्यांपैकी १,७३,८३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १६,७५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १०४८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ११,६९२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५१.१४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. राज्यात २,११,११२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३,१०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -