घरCORONA UPDATECoronavirus Update: आज राज्यात ११६ मृत्यू; २६८२ नव्या रुग्णांची नोंद!

Coronavirus Update: आज राज्यात ११६ मृत्यू; २६८२ नव्या रुग्णांची नोंद!

Subscribe

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी राज्यात १०० हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ११६ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची राज्यातली संख्या २०९८ झाली आहे. त्यासोबतच आज राज्यात तब्बल २ हजार ६८२ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ६२ हजार २२८ झाला असून त्यातले ३३ हजार १२४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा २६ हजार ९९७ झाला आहे.

 

- Advertisement -
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       ३६९३२ ११७३
ठाणे          ५७७
ठाणे मनपा ३४०९ ७१
नवी मुंबई मनपा २४६१ ५०
कल्याण डोंबवली मनपा ११९१ १९
उल्हासनगर मनपा २६७
भिवंडी निजामपूर मनपा १०८
मीरा भाईंदर मनपा ६२५ १३
पालघर १३७
१० वसई विरार मनपा ७७६ २०
११ रायगड ५५३ १५
१२ पनवेल मनपा ४४६ १४
  ठाणे मंडळ एकूण ४७४८२ १३९७
१३ नाशिक १४८
१४ नाशिक मनपा १९०
१५ मालेगाव मनपा ७३२ ५२
१६ अहमदनगर ७५
१७ अहमदनगर मनपा २१
१८ धुळे ३४
१९ धुळे मनपा १०१
२० जळगाव ३९९ ६०
२१ जळगाव मनपा १५६
२२ नंदूरबार ३३
  नाशिक मंडळ एकूण १८८९ १५४
२३ पुणे ४७१
२४ पुणे मनपा ६३२१ २९६
२५ पिंपरी चिंचवड मनपा ४३१
२६ सोलापूर ४२
२७ सोलापूर मनपा ७२७ ६०
२८ सातारा ४५९ १६
  पुणे मंडळ एकूण ८४५१ ३९२
२९ कोल्हापूर ३५०
३० कोल्हापूर मनपा २९
३१ सांगली ९३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११
३३ सिंधुदुर्ग २१
३४ रत्नागिरी २१६
  कोल्हापूर मंडळ एकूण ७२० १०
३५ औरंगाबाद ३०
३६ औरंगाबाद मनपा १३८० ६४
३७ जालना ११७
३८ हिंगोली १४३
३९ परभणी ३३
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण १७१२ ६६
४१ लातूर ९८
४२ लातूर मनपा १०
४३ उस्मानाबाद ६४
४४ बीड ४६
४५ नांदेड २२
४६ नांदेड मनपा ८६
  लातूर मंडळ एकूण ३२६
४७ अकोला ४२
४८ अकोला मनपा ४९५ २३
४९ अमरावती १६
५० अमरावती मनपा १८६ १४
५१ यवतमाळ १२८
५२ बुलढाणा ५६
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण ९३१ ४७
५४ नागपूर १३
५५ नागपूर मनपा ४९८
५६ वर्धा ११
५७ भंडारा २५
५८ गोंदिया ५८
५९ चंद्रपूर १६
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली ३१
  नागपूर एकूण ६६१ १०
  इतर राज्ये /देश ५६ १३
  एकूण ६२२२८ २०९८

 

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७७ पुरुष तर ३९ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४८  रुग्ण आहेत तर ५५  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या ११६ रुग्णांपैकी ७५ जणांमध्ये ( ६५ %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २०९८ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४६ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे १६ मे ते २६ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७० मृत्यूंपैकी मुंबई १६, जळगाव- १४, नवी मुंबई -९, धुळे -६, मालेगाव -५ , औरंगाबाद ३, भिवंडी-३, नाशिक -३ , अमरावती -२ , कोल्हापूर -२, मीरा भाईंदर -२ , रायगड -२ , सोलापूर -२ आणि १ मृत्यू ठाणे येथील आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -