Coronavirus Live Update : ठाणे जिल्ह्यात ४ दिवस भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद!

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने भारतात देखील थैमान घातले आहे. भारतात कोरोनाचा आकडा ६ हजारच्यावर गेला आहे. त्यात महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे.

coronavirus live update
कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

मीरा-भाईंदरपाठोपाठ ठाणे जिल्ह्यात देखील आज मध्यरात्रीपासून भाजीपाला, बाजारपेठा बंद राहतील. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिंवंडी या बाजारपेठा देखील बंद राहतील


मीरा-भाईंदरमध्ये ११ एप्रिल सकाळी ६ वाजेपासून १४ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत भाजीपाला विक्री बंद.


विक्रोळीमध्ये शुक्रवारी कोरोनाचे दोन नवे रुग्ण सापडले. विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये 40 वर्षीय महिला तर टागोर नगरमध्ये 63 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित सापडल्याने विक्रोळीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


मुंबईत आज दिवसभरात कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे.

deaths in mumbai


मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ९९३वर. आज दिवसभरात मुंबईत सापडले २१८ रुग्ण. यापैकी ६० टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणं जाणवत नव्हती. त्यामुळे या रुग्णांना सायलेंट कॅरिअर म्हटलं जात आहे.

letter


भारतातील लॉकडाउन सर्वात प्रभावी – ऑक्सफोर्ड विद्यापीठाकडून कौतुक

ब्रिटनच्या प्रतिष्ठित ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने कोरोनाच्या विरोधात भारतातील लॉकडाउन हा सर्वात प्रभावी आहे, या साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताने वेळेत योग्य ती पावले उचलली, असे म्हटले आहे. देशातील कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी पंतप्रधानांनी २१ दिवस लॉकडाऊन जाहीर केले. हा लॉकडाउन १४ एप्रिल रोजी समाप्त होणार आहे. देशात आतापर्यंत कोरोनाची ६,४१२ प्रकरणे नोंदली गेली आहेत, या धोकादायक आजारामुळे १९९ लोकांचा मृत्यू झाला आहे.  जगभरातील देश कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी काय प्रयत्न करत आहात, यावर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी अभ्यास करत आहे. त्यात भारताविषयी म्हटले आहे कि भारताने ज्या पध्द्तीने लॉकडाउन लागू केला आणि इतर पावले उचलली गेली त्यात १०० टक्के सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत, तर अमेरिकेने कोरोनावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांचा ६७ टक्के परिणाम दिसले आहेत, असे यात म्हटले आहे.

नगर जिल्ह्यात कोरोनाने पहिला बळी घेतला आहे. श्रीरामपूर येथील २८ वर्षीय मतिमंद तरुणाचा पुण्यात मृत्यू झाला. मात्र हा मृत्यु कोरोनामुळे झाला की अन्य आजाराने याबाबत अनिश्चितता आहे. या तरुणाला इतरही आजारांनी ग्रासले होते. जिल्ह्यात आत्तापर्यत २६ कोरोना रुग्ण होते, त्यापैकी तीन ठणठणीत बरे झाले तर एकाचा मृत्यू झाला. तिसऱ्या कोरोनामुक्त रुग्णालादेखील शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्हा प्रशासनाने त्याच्या मृत्यूस दुजोरा दिला.


एप्रिल महिन्यात देशभरात सर्व प्रकारचे सण, उत्सव आणि सभांवर बंदी घातल्याचे आदेश केंद्रीय गृहविभागाने दिले आहेत.


भारत अजूनही कोरोना स्प्रेडच्या तिसऱ्या स्टेजमध्ये गेलेला नाही. भारतात कम्युनिटी स्प्रेडला सुरूवात झालेली नाही अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिली आहे.


धारावीतील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिका तब्बल साडेसात लाख लोकांच्या चाचण्या करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.


डॉक्टरच्या चुकीमुळे कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे अनेकांचे बळी जात आहेत. मात्र, रत्नागिरीमध्ये एका डॉक्टरच्या चुकीमुळे एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्याप या डॉक्टराला अटक करण्यात आलेली नाही. (सविस्तर वृत्त)

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने महापालिकेला तीन कोटींची मदत केली आहे.


खारघरमध्ये आढळलेल्या कोरोनाबाधित रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. हा पनवेलमधील कोरोनाचा पहिला बळी आहे. त्यामुळे आता नवी मुंबईत देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. (सविस्तर वृत्त)


दादरमध्ये आज पुन्हा कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. दादरच्या सुश्रूषा रुग्णालयातील दोन परिचारिकांना कोरोनाची लागण झाली आहे. (सविस्तर वृत्त)


धारावीमध्ये पाच नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. (सविस्तर वृत्त)


सांगलीतील २६ रुग्णांपैकी २२ रुग्ण कोरोनामुक्त

तुम्हा सर्वांना सांगण्यात आनंद होतोय की सांगलीतील २६ रुग्णांपैकी २२ रुग्ण आता कोरोनामुक्त झाले आहेत. आपण कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होत आहे. जिल्ह्यात २६ रुग्ण आढळल्याने पालकमंत्री आणि इस्लामपूर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून दुहेरी दडपणात होतो. मात्र, आता दिलासा मिळाला आहे’, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.


वाधवानप्रकरणी अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर

येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्यातील वाधवान बंधू यांनी संचारबंदी असतानाही खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास केल्याची धक्कादायक माहितील समोर आली असून यासाठी विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांच्या पत्राद्वारे त्यांना परवानगी मिळाल्याचे समजते. ही बाब उघड झाल्यानंतर सरकारवर विरोधकांनी चहू बाजूंनी प्रश्नांचा भडिमार केला. अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांना वाधवान प्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. अनिल देशमुख यांनी रात्री दोन वाजत या संदर्भात ट्विटरवरून माहिती दिली.


‘गुड फ्रायडे’वर कोरोनाचे सावट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माहिमचे चर्च बंद करण्यात आले आहे.


नागपुरात कोरोना बाधितांचा आकडा सहाने वाढला आहे. नागपुरात आता कोरोनाबाधितांची संख्या २५ झाली आहे, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.


मुंबईत एकूण ३८१ बाधित क्षेत्र

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ७०० च्या घरात पोहोचलेली असून ज्या भागांमध्ये कोरोनाग्रस्त आढळून आलेले आहेत, त्या भागांना बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मुंबईत एकूण ३८१ क्षेत्र बाधित म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये डी विभागात सर्वाधिक बाधित क्षेत्र असून या विभागात ४९ बाधित क्षेत्र आहेत. के-पश्चिम : ४१, ई विभाग : ३३ एम-पश्चिम : २४, एम-पश्चिम : २४ बाधित क्षेत्र घोषित केली आहे.

वॉर्ड नुसार बाधित क्षेत्रांची संख्या

 • ए विभाग : ०३
 • बी विभाग : ०३
 • सी विभाग : ०५
 • डी विभाग : ४९
 • ई विभाग विभाग: ३३
 • एफ –दक्षिण विभाग : ११
 • एफ- उत्तर विभाग: ०५
 • जी-दक्षिण विभाग: १५
 • जी-उत्तर विभाग : ०५
 • एच-पूर्व विभाग: ०९
 • एच-पश्चिम विभाग: १४
 • के-पूर्व विभाग: २०
 • के-पश्चिम विभाग: ४१
 • पी-दक्षिण विभाग: ०९
 • पी-उत्तर विभाग : २३
 • आर-दक्षिण विभाग : १३
 • आर-मध्य विभाग : ११
 • आर-उत्तर विभाग : ०५
 • एल विभाग : १८
 • एम-पूर्व विभाग: २४
 • एम-पश्चिम विभाग: २४
 • एन विभाग : १६
 • एस विभाग : २३
 • टी विभाग : ३

गृह विभागाच्या विशेष प्रधान सचिवांवर कारवाई

देशात लॉकडाऊन असताना देखील ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह २३ जण सुट्टी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचे प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचे उघड झाले आहे. यावरून विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.


जगभरात ८८ हजार ९८१ जणांचा मृत्यू

कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत ८८ हजार ९८१ जणांचा मृत्यू झाला असून १९२ देशांमधील १५ लाख १९ हजार २६० जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी तीन लाख १२ हजार १०० जण उपचारांनंतर बरे झाले आहेत. युरोपमध्ये सात लाख ८७ हजार ७४४ जणांना लागण झाली असून आतापर्यंत ६२ हजार ४०२ जणांचा मृत्यू झाला आहे.


मालेगावमध्ये आणखी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.


नाशिकमध्ये आत्तापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ वर गेली आहे. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. मालेगावमध्ये एकूण ९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर नाशिक शहरात दोघांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.