घरCORONA UPDATEमुंबई पोलीस दलाला धक्का; आणखी एका पोलीस हवालदाराचा कोरोनाने मृत्यू

मुंबई पोलीस दलाला धक्का; आणखी एका पोलीस हवालदाराचा कोरोनाने मृत्यू

Subscribe

मुंबई पोलीस दलातील हा तिसरा कोरोनाचा बळी आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकिय कर्मचाऱ्यांप्रमाणेच रात्रंदिवस काम करणारे पोलीसदेखील कोरोनाच्या विळख्यात सापजले आहेत. काही दिवसांपूर्वीच २ पेलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान, मुंबईच्या कुर्ला वाहतूक विभागातील पोलीस हवालदाराचा कोरोनाशी लढा देताना दुर्दैवी अंत झाला आहे. शिवाजी नारायण सोनावणे (५६) असं या हवालदारचं नाव आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांनी ट्विटरद्वारे दिली आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवाने कोरोनाविरोधातील लढाईत ते अपयशी ठरले. या घटनेवर मुंबई पोलिसांनी हळहळ व्यक्त केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दुःखद बातमी; मुंबईत कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या पोलीस दलातील दोन हेड कॉन्स्टेबल्सना कोरोनामुळे आपला जीव गमावावा लागला. त्यानंतर आता वाहतूक विभागातील हवालदाराचा कोरोनाने मृत्यू झाल्याने संपूर्ण पोलीस दलात दुःख व्यक्त केलं जात आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांनाच आता कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील आतापर्यंत ९० हुन अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -