घरCORONA UPDATEदेशात कोरोनाच्या संसर्गात पुणे आघाडीवर

देशात कोरोनाच्या संसर्गात पुणे आघाडीवर

Subscribe

देशात कोरोनाच्या संसर्गात पुणे आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

‘पुणे तिथे काय उणे..’असं उगाच म्हटलं जात नाही. पुणेरी माणसं सर्वच गोष्टीत आघाडीवर असतात. आता पुणे कोरोनाच्या संसर्गात देखील आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. देशात २३ चाचण्यांमधून कोरोनाचा सरासरी एक रुग्ण आढळत असताना पुण्यात मात्र, नऊ चाचण्यांवर कोरोनाचा एक रुग्ण आढळून येत आहे. पुण्यात रुग्णवाढ दुप्पट होण्याचा वेग हा ७ दिवसांचा आहे. यामुळे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची लवकरात लवकर माहिती घेऊन त्यांच्या चाचण्या केल्या पाहिजेत, अशा उपाययोजना केंद्रीय पथकाने (IMCT) सुचवल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने आज दिली आहे.

याबाबत केंद्रीय पथकाने केली चर्चा

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड, स्थलांतरीत मजुरांचा परिसर, भाजीपाला मार्केट, रेशन दुकाने, जिल्हा परिषदेचे नियंत्रण कक्ष, जिल्हा परिषदेचे नियंत्रण कक्ष, महापालिकेचे नियंत्रण कक्ष आणि रुग्णालयाची केंद्रीय पथकाने पाहणी केली. यानंतर केंद्रीय पथकाने राज्य सरकारला काही सूचना केल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत केंद्रीय पथकाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे चर्चा केली आहे.

- Advertisement -

सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, असे सातत्याने सांगितले जात आहे. मात्र, त्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. पुण्यातील झोपडपट्टी, भाजीपाला बाजारांसह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाही. झोपडपट्ट्यांमध्ये होम क्वॉरंटाइन ऐवजी इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाइन अधिकाधिक करण्याची गरज आहे. डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि आवश्यक वस्तू आणि सेवा पुरवणारे दुकानदार आणि भाजी विक्रेते करोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. ही बाब अतिशय चिंताजनक आहे आणि यांच्या संपर्कात येऊन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र, सेवा देणाऱ्यांनी नियमांचे पालन काटेकोरपणे करणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वत:ची काळजी घेतली पाहिजे, असे केंद्रीय पथकाने म्हटले आहे.


हेही वाचा – शिकाऊ डॉक्टरच्या संपर्कातील पाच क्वारंटाईन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -