घरCORONA UPDATECovid 19: कोणकोणती शहरे कंटेनमेंट झोनमध्ये ? गृहमंत्रालयाचा नवीन आदेश जारी

Covid 19: कोणकोणती शहरे कंटेनमेंट झोनमध्ये ? गृहमंत्रालयाचा नवीन आदेश जारी

Subscribe

एका आठवड्यात ६० टक्क्यांहून अधिक बेड भरले जात आहेत अशी ठिकाणेही कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करणार

राज्यातील कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता राज्याचा लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गृहमंत्रालायाकडून सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे गृहमंत्रालायाने नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या जास्त आहे तो भाग किंवा ते ठिकाण कंटेनमेंट झोनचा पर्याय राबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोन अशाच भागात लावले जातील ज्या भागात कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्याचा दर हा १० टक्क्यांपेक्षा जास्त असेल असा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात यावा. त्याचप्रमाणे गृहमंत्रालायाने या आदेशात असे म्हटले आहे की, ज्या ठिकाणी एका आठवड्यात ६० टक्क्यांहून अधिक बेड भरले जात आहेत अशी ठिकाणेही कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करावे.

काय आहे नवीन नियमावली?

  • दहा टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णवाढीचा दर असलेल्या भागात कंटेनमेंट झोन
  • एका आठवड्याला ६० पेक्षा जास्त बेड भरल्यास त्या भागात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येईल.
  • ज्या भागात रुग्णसंख्या जास्त आहे त्या भागात अत्यावश्यक सेवा वगळता रात्रीच्या वेळी येण्याजाण्यास बंदी.
  • सामाजिक,राजकीय,क्रिडा,मनोरंजन,सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसाठी गर्दी करण्यात मनाई.

सामुदायिक आणि मोठे कंटेनमेंट झोन तयार करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा सल्ला देण्यात आला आहे. त्यात असे म्हटले आहे की, कोविड १९ च्या व्यवस्थापनासाठी लागू करण्यात आलेली राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे संपूर्ण देशात ३१मे पर्यंत कठोरपणे लागू केली जातील.

- Advertisement -

हेही वाचा –  बंगालच्या वाघीण ममता बॅनर्जीच! पाचपैकी दोन राज्यात भाजप पुढे

 

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -