घरदेश-विदेशबंगालच्या वाघीण ममता बॅनर्जीच! पाचपैकी दोन राज्यात भाजप पुढे

बंगालच्या वाघीण ममता बॅनर्जीच! पाचपैकी दोन राज्यात भाजप पुढे

Subscribe

पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पॉण्डेचेरी या पाच राज्यांचे मतदान पार पडले असून या राज्यात कोण बाजी मारणार हे रविवारी 2 मे रोजी जाहीर होणार आहे. पाचपैकी पश्चिम बंगालच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असताना या राज्यात ममता बॅनर्जींची हॅट्ट्रिक जवळपास निश्चित असून तृणमूल काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करण्याची चिन्हे दिसत आहेत. आसाममध्ये सत्ताधारी भाजपसमोर काँग्रेसचे कडवे आव्हान, इथे काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. तामिळनाडूत मात्र मोठा उलटफेर होत असून, सत्ताधारी एआयडीएमकेला मोठा झटका बसण्याचे संकेत आहेत. डीएमके एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. केरळमध्ये सत्ताधारी एलडीएफ पुन्हा डाव मांडण्याची चिन्हे असून एक्झिट पोलमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

तर, पाँडेचेरीमध्ये काँग्रेसला झटका बसण्याचे संकेत असून भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार उलथून लावण्यासाठी भाजपने आपली सारी ताकद पणाला लावली होती. मात्र, भाजपचे स्थापनेचे स्वप्न हे तूर्तास पूर्ण होणार नाही. टाइम्स नाऊ सी व्होटरच्याअंदाजानुसार तृणमूल काँग्रेसला158 जागा मिळणार असून भाजपला 115 जागांवर समाधान मानावे लागेल, तर डाव्यांच्या खात्यात 19 जागा जमा होतील. टीव्ही 9 भारत वर्षने तृणमूलपुढे 142 ते 152 जागा दाखवल्या असून भाजपची उडी 125 ते 135 पर्यंत जाईल, असे दाखवले आहे. आर भारत सीएनएक्सच्या मते मात्र तृणमूल आणि भाजपमध्ये कडवी लढत असून ममता यांच्या पक्षाला 126 ते 136, तर भाजपाला 138 ते 148 इतक्या जागा दाखवल्या आहेत. आसाममध्ये टक्कर दुसरीकडे आसाममध्ये काट्याची टक्कर असल्याचे दिसते.

- Advertisement -

आसाममधील एकूण 126 जागांपैकी भाजपप्रणित एनडीएला 59 ते 69, तर काँग्रेसप्रणित युपीएला 55 ते 65 मिळण्याचा अंदाज आहे. राज्यातील सत्तेत पुनरागमन करण्यासाठी भाजपने संपूर्ण जोर लावला आहे, तर भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी काँग्रेसने आकाशपाताळ एक केले आहे. या निवडणुकीत सध्या तरी सीएएचा म्हणजे नागरिकता दुरुस्ती अधिनियमाचा मुद्दा दिसत नव्हता. तामिळनाडूत सत्तापरिवर्तन होण्याचा अंदाज आहे. सत्ताधारी एआयडीएमकेला विरोधी पक्ष द्रमुक अर्थात डीएमकेने मोठा झटका दिल्याचे चित्र आहे. एआयडीएमकेला केवळ 75 ते 85 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर डीएमकेने मोठी मजल मारत 143 ते 153 जागा काबिज करण्याचा अंदाज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -