घरCORONA UPDATEPositive News: आज राज्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त

Positive News: आज राज्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त

Subscribe

मागच्या काही काळापासून राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा काळजी वाढविणारा होता. मात्र आजचे आकडे दिलासादायक ठरले आहेत. आज राज्यात १४ हजार ३४८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १६ हजार ८३५ एवढी आहे. राज्यात आज २७८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. मागच्या काही दिवसांतील हा सर्वात कमी आकडा आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

आज नोंद झालेल्या एकूण २७८ मृत्यूंपैकी १५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६३ मृत्यू ठाणे – १४, सातारा-१३, नागपुर – ११, पुणे – ८, नाशिक – ४, जळगाव – २, जालना – २, कोल्हापुर – २, सांगली – २, वर्धा – १, सोलापुर – १, मुंबई – १, रायगड – १ आणि चंद्रपूर – १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -