स्मृती इराणींच्या दौऱ्यात राडा, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांसह 40 महिला कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Crime filed against 40 women activists including NCP's Rupali Patil
Crime filed against 40 women activists including NCP's Rupali Patil

स्मृती इराणी भाजपच्या कार्यक्रमासाठी पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने स्मृती इराणी थांबलेल्या हॉटेलबाहेर आंदोलन करण्यात आले होते. यानंतर रस्त्यावर बेकायदा जमान जमवून आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पटील यांच्यासह कार्यकर्त्यां विरोधात चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी रुपली पाटील यांच्यासह उदय महाले, निलेश निकम, महेश हांडे आणि 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक बसवराज माळी यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे.

मनमोहन सिंग सरकारच्या काळात महागाईविरोधात स्मृती इराणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होत्या. त्यानी त्याकाळच्या युपीए सरकारला बांगड्यांचा आहेर पाठवला होता. आता मोदी सरकारमध्ये स्मृती इरानी मंत्री आहेत. अशावेळी इराणी गप्प का?, असा प्रश्न राष्ट्रवादी महिला काँग्रेस कडून विचारण्यात आला होता. यावेळी महिला कार्यक्त्यांनी स्मृती इराणींना मागण्यांचे निवेदन द्यायचे आहे. त्यांना बांगड्या द्यायच्या आहेत, अशी मागमी करत स्मृती इराणी थांबलेल्या हॉटेलमध्ये घूसन्याचा प्रयत्न केला होता.

स्मृती इराणींचे उत्तर –

2014 साली ज्या परिसराला लोक काँग्रेस कुटुंबाचा मजबूत किल्ला म्हणून ओळखायचे होते. तीथे जाऊ मी निडणूक लढवली आहे. 2019 साली आमेठीत भाजप आशा पद्धतीने निवडणूक लढली की काँग्रेसच्या अध्यक्षांना आपली सीट सोडून दूसरीकडून निवडणूकीला उभारावे लागले. त्यानंतर काँग्रेसने पक्षाने माझ्यावर नाराज असने स्वभावीक आहे. राष्ट्रवादी पक्ष सुद्धा काँग्रेस पक्षातून उत्पन्न झाला आहे. त्यामुळे माझ्या प्रती त्यांचे आक्रमाक असने स्वभावीक आहे. मी इतकेच सांगेन की आम्ही भाजपच्या संघटने कौशल्यातून काँग्रेसच्या अध्यक्षांना पहिल्यांदा निवडणूकीत हरवले आहे. त्याचा परिनाम ते भोगत आहेत आणि पुढे ही भोगतील. काँग्रेसला याचे सदैव दुख: राहील की भाजपच्या साधारण कार्यकर्त्यांने त्यांच्या अध्यक्षांना हारवले, असे स्मृती इरानी म्हणाल्या.