घरताज्या घडामोडी'या' महिन्यात मराठवाड्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान; 2500 कोटींच्या मदतीची गरज

‘या’ महिन्यात मराठवाड्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान; 2500 कोटींच्या मदतीची गरज

Subscribe

राज्याच्या अनेक भागांत मागील काही दिवसांत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या जोरदार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

राज्याच्या अनेक भागांत मागील काही दिवसांत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या जोरदार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे यंदा जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 12 लाख 49 हजार 731 हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. दरम्यान यातून सावरत असतानाच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पुन्हा झालेल्या अतिवृष्टीमुळे उरलेल्या पिकांचेही नुकसान झाले. (crop loss on 17 lakh hectares in Marathwada in September October)

मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यात मराठवाड्यात 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे 28 लाख 76 हजार 816 शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तसेच, या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी 2479 कोटींच्या मदतीची गरज असल्याचे समजते.

- Advertisement -

यंदा मराठवाड्यात जास्तीचा पाऊस झाला. 727 मिमी पाऊस अपेक्षित असताना, 911 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या जास्तीच्या पावसामुळे मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कापूस, सोयाबीन, मका, फळपिकांना बसला आहे.

यंदा सोयाबीनचे पेरणी अधिक झाली होती. पण सोयाबीन काढणीला आला असतानाच परतीच्या पावसाने झोडून काढले. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सरकराने भरीव मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहे.

- Advertisement -

‘या’ शेतकऱ्यांचे नुकसान

  • औरंगाबाद जिल्ह्यात 6 लाख 79 हजार 56 शेतकऱ्यांचे 4 लाख 43 हजार 943 हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
  • बीड जिल्ह्यात 7 लाख 87 हजार 799 शेतकऱ्यांचे 4 लाख 78 हजार 327 हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
  • जालना जिल्ह्यात 5 लाख 67 हजार 826 शेतकऱ्यांचे 3 लाख 88 हजार 922 हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
  • परभणी जिल्ह्यात 4 लाख 61 हजार 407 शेतकऱ्यांचे 2 लाख 19 हजार 105 हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
  • हिंगोली जिल्ह्यात 54 हजार 876 शेतकऱ्यांचे 12 हजार 360 हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
  • नांदेडच्या 49 हजार 885 शेतकऱ्यांचे 21 हजार 500 हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
  • लातूर जिल्ह्यात 16 हजार 948 शेतकऱ्यांचे 14 हजार 942 हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
  • उस्मानाबाद जिल्ह्यात 2 लाख 59 हजार 19 शेतकऱ्यांचे 1 लाख 91 हजार 579 हेक्टर शेतीचे नुकसान झाले.

हेही वाचा – कैलास पाटील यांचे उपोषण अखेर मागे, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेनंतर निर्णय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -