घरताज्या घडामोडीमध्य रेल्वेवर दीपावली निमित्त विशेष ट्रेन, पहा संपूर्ण वेळापत्रक

मध्य रेल्वेवर दीपावली निमित्त विशेष ट्रेन, पहा संपूर्ण वेळापत्रक

Subscribe

दिवाळी निमित्त अनेक जण गावी किंवा फिरण्यासाठी इतर ठिकाणी जात असतात. त्यामुळे मध्य रेल्वेने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी दिवाळीसाठी विशेष ट्रेन सुरू केल्या आहेत. लोकमान्य टिळक टर्निमन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच पुण्याहून या विशेष ट्रेन सुटणार आहेत. जाणून घ्या मध्य रेल्वेवर दीपावली निमित्त विशेष ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक.

 

- Advertisement -

लोकमान्य टिळक टर्मिनस – बरौनी विशेष

05298 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १५.११.२०२१ (सोमवार) रोजी १२.१५ वाजता सुटेल आणि बरौनी येथे तिसऱ्या दिवशी ०५.०० वाजता पोहोचेल.
05297 विशेष बरौनी येथून दि. १३.११.२०२१ (शनिवार) रोजी १६.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी १०.०० वाजता पोहोचेल.

थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी जंक्शन, वाराणसी, छपरा, हाजीपूर, मुझफ्फरपूर आणि समस्तीपूर

- Advertisement -

संरचना: २ तृतीय वातानुकूलित, १० तृतीय वातानुकूलित आणि ९ द्वितीय आसन श्रेणी.

पुणे – पाटणा विशेष

03382 विशेष दि. १४.११.२०२१ (रविवार) रोजी पुणे येथून ०५.३० वाजता सुटेल आणि पाटणा येथे दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.
03381 विशेष गाडी दि. १२.११.२०२१ (शुक्रवार) रोजी पाटणा येथून १०.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १८.५० वाजता पोहोचेल.

थांबे: दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी जंक्शन, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.

संरचना: ६ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ९ द्वितीय आसन श्रेणी.

आरक्षण: 05298 आणि 03382 विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. ३०.१०.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

 

लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष वातानुकूलित साप्ताहिक (८ फेऱ्या)

01235 साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ०२.११.२०२१ ते २३.११.२०२१ (४ फेऱ्या) पर्यंत दर मंगळवारी १६.४० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल.
01236 विशेष साप्ताहिक दर गुरुवारी गोरखपूर येथून दि. ०४.११.२०२१ ते २५.११.२०२१ (४ फेऱ्या) ०४.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२.१५ वाजता पोहोचेल.

थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बिना, झाशी, ओराई, पोखरायन, कानपूर, लखनौ, गोंडा आणि बस्ती.

संरचना: १ प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित आणि एक पॅन्ट्री कार

लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष अतिजलद साप्ताहिक (८ फेऱ्या)

01241 विशेष साप्ताहिक लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ०५.११.२०२१ ते २६.११.२०२१ (४ फेऱ्या) दर शुक्रवारी १३.४० वाजता वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.५० वाजता गोरखपूरला पोहोचेल.
01242 विशेष अतिजलद साप्ताहिक दि. ६.११.२०२१ ते २७.११.२०२१ (४ फेऱ्या) दरम्यान दर शनिवारी २१.१५ वाजता गोरखपूर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.

थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बिना, झाशी, कानपूर, लखनौ, गोंडा आणि बस्ती

संरचना: १ प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, १० तृतीय वातानुकूलित, ६ द्वितीय आसन श्रेणी.

लोकमान्य टिळक टर्मिनस – समस्तीपूर विशेष अतिजलद (६ फेऱ्या)

01243 विशेष अतिजलद साप्ताहिक लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ०१.११.२०२१ ते १५.११.२०२१ (तीन फेऱ्या) दरम्यान दर सोमवारी १५.५० वाजता सुटेल आणि समस्तीपूर येथे तिसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल.
01244 विशेष अतिजलद साप्ताहिक समस्तीपूर येथून दि. ०३.११.२०२१ ते १७.११.२०२१ (तीन फेऱ्या) दर बुधवारी ०७.२५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १८.१५ वाजता पोहोचेल.

थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी जंक्शन, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुझफ्फरपूर.

संरचना: १ प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, १० तृतीय वातानुकूलित, ६ द्वितीय आसन श्रेणी.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – भागलपूर विशेष अतिजलद साप्ताहिक (६ फेऱ्या)

01245 विशेष अतिजलद साप्ताहिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. १.११.२०२१ ते १५.११.२०२१ (३ फेऱ्या) दर सोमवारी ११.०५ वाजता सुटेल आणि भागलपूर येथे दुसऱ्या दिवशी २१.२५ वाजता पोहोचेल.
01246 विशेष अतिजलद साप्ताहिक भागलपूर येथून दि. ०३.११.२०२१ ते १७.११.२०२१ (तीन फेऱ्या) दर बुधवारी सकाळी १०.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २३.०० वाजता पोहोचेल.

थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी जंक्शन, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पटना, बख्तियारपूर, मोकामा, किऊल, जमालपूर आणि सुलतानगंज.

संरचना: १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ५ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी.

पुणे – बनारस विशेष अतिजलद साप्ताहिक (६ फेऱ्या)

01237 विशेष अतिजलद साप्ताहिक दि. १.११ २०२१ ते १५.११.२०२१ (३ फेऱ्या) दर सोमवारी पुणे येथून २०.५० वाजता सुटेल आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी २३.१० वाजता पोहोचेल.
01238 विशेष अतिजलद साप्ताहिक दि. ३.११.२०२१ ते १७.११.२०२१ (३ फेऱ्या) दर बुधवारी ०१.१० वाजता बनारस येथून सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०६.२५ वाजता पोहोचेल.

थांबे: दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, प्रयागराज, माणिकपूर आणि ज्ञानपूर रोड.

रचना: १५ तृतीय वातानुकूलित आणि ३ द्वितीय आसन श्रेणी.

आरक्षण: 01235, 01237, 01241, 01243 आणि 01245 या विशेष ट्रेनचे बुकिंग दि. २९.१०.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.


हेही वाचा – ST Workers Strike: एसटी कर्मचारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर, पडळकर म्हणतात कारवाई केली तर..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -