घरताज्या घडामोडीसायबर गुन्हेगारांचा शिर्डी साईबाबांच्या देणगीवरही डल्ला, भक्तांची अन्न दान देणगीच्या नावाने फसवणूक

सायबर गुन्हेगारांचा शिर्डी साईबाबांच्या देणगीवरही डल्ला, भक्तांची अन्न दान देणगीच्या नावाने फसवणूक

Subscribe

असंख्य साईभक्त शिर्डी येथे श्री साईप्रसादालयात अन्नदानाकरीता थेट अथवा ऑनलाईन देणगी देत असतात.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात लॉकडाऊन करण्यात आला असून येत्या १ जुन पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्व मंदिरे धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु अनेक भक्तांना मंदिरापर्यंत जाता येत नसले तरी ते ऑनलाईन स्वरुपात देणगी देत आहेत. परंतु या भाबड्या भक्तांना सायबर गुन्हेगार निशाणा करत असतात. सायबर गुन्हेगार ऑनलाई देणगी देणाऱ्या भक्तांची फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शिर्डी – देशातील व राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या कोविड-१९ संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक ०५ एप्रिल २०२१ रोजी पासून श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता बंद ठेवण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत श्री साईबाबा सेवाभावी संस्थान, शिर्डी नामक संस्थेकडून गुरुवारचे अन्नदान या आशयाखाली साईभक्तांकडून ऑनलाईन, पेटीएम व गुगलपे व्दारे देणगीची मागणी केली जात असून ह्या संस्थेशी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डिचा कुठलाही संबंध नसल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली. श्री. कान्हूराज बगाटे म्हणाले, श्री क्षेत्र शिर्डी हे देशातील नामांकित देवस्थान असून श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता देशाच्या व जगाच्या कानाकोप-यातुन भक्‍त दर्शनाकरीता शिर्डी येथे येत असतात.

- Advertisement -

श्री साईबाबांच्या शिकवणी नुसार अन्नदानास अनन्य साधारण महत्व असल्यामुळे असंख्य साईभक्त शिर्डी येथे श्री साईप्रसादालयात अन्नदानाकरीता थेट अथवा ऑनलाईन देणगी देत असतात. सध्या देशातील व राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने दिनांक ०४ एप्रिल २०२१ च्या ‘कोबीड-१९ संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक ०५ एप्रिल २०२१ रोजी पासून पुढील आदेशापर्यंत श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता बंद ठेवण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत श्री साईबाबा व संस्थानचे नावाशी साधर्म्य असलेल्या बनावट संस्था, वेबसाईट, फेसबुक इत्यादी सारख्या माध्यमातुन साईभक्तांची फसवणूक तथा दिशाभुल करुन त्यांचेकडून रोख रक्कमेच्या व ऑनलाईन स्वरुपात देणगी जमा करण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत.

तसेच याप्रमाणे श्री साईबाबा सेवाभावी संस्थान, शिर्डी नामक संस्थेकडून गुरुवारचे अन्नदान या आशयाखाली साईभक्तांकडून ऑनलाईन, पेटीएम व गुगलपे व्दारे देणगीची मागणी केली जात असून ह्या संस्थेशी श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्तव्यवस्था, शिर्डीचा कुठलाही संबंध नाही. तसेच अशाप्रकारे देणगी जमा करणा-या संस्थाकडून साईभक्तांची फसवणूक होवु शकते त्यामुळे साईभक्तांनी सावध रहावे असे सांगून श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्तव्यवस्था, शिर्डीस देणगी देण्याकरीता तसेच अधिक माहिती करीता संस्थानचे www.sai.org.in व online.sai.org.in या अधिकृत संकेतस्थळवर संपर्क साधावा असे आवाहन ही श्री.कान्हूराज बगाटे यांनी केले.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -