घरठाणेआदिवासींच्या लसींवर इतरांचा डल्ला; माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत

आदिवासींच्या लसींवर इतरांचा डल्ला; माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत

Subscribe

 पल्स पोलिओच्या धर्तीवर घरोघरी जाऊन लसीकरण राबवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे शिवसेनाग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शहापुरात स्पष्ट केले.

ग्रामीण भागात आदिवासींच्या लसीकरणावर इतर नागरिक येऊन डल्ला मारत आहेत. हे चुकीचेच आहे. त्यामुळे आदिवासी बांधव लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी नेते माजी आरो पल्स पोलिओच्या धर्तीवर घरोघरी जाऊन लसीकरण राबवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे शिवसेनाग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शहापुरात स्पष्ट केले.तालुक्यातील कोविड तसेच लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुधवारी शहापूरला भेट दिली. शहापूर पंचायत समितीच्या सभापतींच्या दालनात तालुक्यातील कोविड आणि लसीकरणाच्या समस्या जाणून घेतल्या व योग्य सूचना केल्या. यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा, सभापती रेश्मा मेमाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी मनीष रेंगे, गटविकास अधिकारी अशोक भवारी, तालुका आरोग्य अधिकारी तरुलता धानके आदींसह शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे, तालुका आरोग्य प्रमुख मिलिंद देशमुख, दत्ता ठाकरे, बंडू शृंगारपुरे, मोहन जाधव, माजी उपसभापती पद्माकर वेखंडे, मोहन कंठे, विकास शेलार, वृषाल गुजरे आरोग्य सेवक नामदेव अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी कोविड व लसीकरण संदर्भात आढावा घेऊन योग्य सूचना केल्या. त्याआधी डॉ. सावंत यांनी वासिंद प्राथमिक केंद्राला भेट दिली असता तेथे सिरीज, निडल आणि बॉटल मध्ये लस शिल्लक रहात असल्याने लस वाया जात असल्याचे स्पष्ट झाले. एका बॉटल मध्ये आठ डोस होत असून लसीचा योग्य वापर करा, लस वाया जाऊ देऊ नका, असे सांगून लसीकरणासाठी केरळ पॅटर्न राबविण्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना केल्या. कोविडचा मृत्यदर रोखण्यासाठी तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. मात्र ग्रामीण भागात नेटवर्कची गहन समस्या आहे. तर बहुतांशी ठिकाणी मोबाईल देखील नाहीत. त्यामुळे तालुक्या बाहेरील नागरिक त्यांच्या मोबाईलद्वारे फास्ट स्पीडवर ऑनलाइन बुकिंग करून आदिवासींच्या लसीकरणावर डल्ला मारत आहेत. यामुळे आदिवासींसह स्थानिक नागरिकांनाही लसीकरणापासून वंचित रहावे लागत आहे. यासाठी आदिवासींचे लसीकरण ऑफलाईन करण्यासाठी तसेच आदिवासींच्या घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -