घरमहाराष्ट्रफडणवीसांना मुंबई पोलिसांची नोटीस

फडणवीसांना मुंबई पोलिसांची नोटीस

Subscribe

आज बीकेसीत जाणार कि पोलीस बंगल्यात येणार

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी नोटीस बजावून रविवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. फडणवीस यांनी स्वतः पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रविवारी आपण बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार असल्याचेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

राज्यातील पोलीस अधिकारी बदली घोटाळ्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पेनड्राईव्ह बॉम्ब टाकत एक स्टिंग ऑपरेशन समोर आणले होते. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर फडणवीस यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. पोलीस आणि इतर अधिकार्‍यांच्या बदली घोटाळ्याच्या संदर्भातील माहिती मी केंद्रीय गृहसचिवांना दिली आहे. त्यानंतर मला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली असून रविवारी मी ११ वाजता बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

- Advertisement -

फडणवीस म्हणाले की, राज्यातील अधिकार्‍यांच्या बदली घोटाळ्याप्रकरणी मी महाघोटाळा उघडकीस आणला होता. कोर्टाने त्याचे गांभीर्य ओळखून सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गोपनीय माहिती लीक कशी झाली याचा एफआयआर महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केला. ऑफिशिअल सिक्रेट अ‍ॅक्टनुसार राज्य सरकारने गुन्हा दाखल केला आहे. मला शुक्रवारी मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून प्रश्नावली पाठवली आहे. विरोधी पक्षनेते म्हणून मला माहितीचा स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही. स्रोत सांगणे बंधनकारक नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मला विशेषाधिकार आहेत. मात्र,याची माहिती मी देईन.

भाजपचे कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करणार
या नोटिशीनंतर भाजप आक्रमक झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांना समर्थन देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते बीकेसीत हजर राहून शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. तर चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे. महाविकास आघाडी सरकार मनमानी करत आहे. मात्र,आम्ही लोकशाही मूल्ये जपतो, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी म्हटले.

- Advertisement -

घोटाळा दाबण्यासाठीच माझ्यावर गुन्हा – फडणवीस
पोलीस बदल्यांमधील घोटाळा दाबण्यासाठीच राज्य सरकारने आपल्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. घोटाळ्याचा अहवाल गेली सहा महिने सरकारकडे पडून होता. त्या अहवालात कोणी किती पैसे दिले आहेत. पैसे देऊन कोण कुठल्या पोलीस ठाण्याला गेले आहे किंवा कोण कुठल्या जिल्ह्यात गेले, अशी सगळी संवेदनशील माहिती अहवालात आहे. मात्र, सहा महिने सरकारने त्यावर कुठलीही कारवाई केली नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -