घरताज्या घडामोडीCyclone Tauktae: तातडीने मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश

Cyclone Tauktae: तातडीने मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश

Subscribe

महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर रात्रभर काम करून काही तासातच ४ लाख १३ हजार ६८४ ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी २ वाजेपर्यंत पूर्ववत केला.

अरबी समुद्रातील ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा मुसळधार पावसासह मोठा तडाखा राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसला. महावितरणच्या भांडूप परिमंडलातील यंत्रणा सज्ज असल्यामुळे यात मोठे नुकसान झाले नाही. जोरदार पाऊस व सोसाट्याचा वाऱ्यामुळे भांडूप परिमंडलातील पेण, वाशी व ठाणे मंडळात ६ लाख ७३ हजार ३६९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर रात्रभर काम करून काही तासातच ४ लाख १३ हजार ६८४ ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी २ वाजेपर्यंत पूर्ववत केला. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी वारंवार माहिती घेऊन सुरु असलेला कामाचा पाठपुरावा केला व मार्गदर्शन दिले. ज्यामुळे तातडीने विजपूवठा पूर्ववत करणे शक्य झाले. तसेच, संचालक संजय ताकसांडे यांनी परिमंडलातील मुख्य अभियंता यांच्याशी संपर्कात राहून महत्वाच्या सूचना दिल्या.

पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी विद्युत फीडर ट्रीप झाले होते, काही ठिकाणी झाड विद्युत वाहिन्यांवर पडले तर काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे अवघ्या सहा तासातच ४ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्वपदावर आणण्यात महावितरण यशस्वी झाले.

- Advertisement -

या चाक्रीवादळामुळे, ठाणे मंडळातील ६८ हजार ८०४ ग्राहकांचा वीजपुरवठा वादळामुळे खंडित झाला होता . त्यातील, ६१ हजार ७९९ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. वाशी मंडळातील १ लाख ४० हजार ७०१ ग्राहकांचा वीजपुरवठा वादळामुळे खंडित झाला असून ५७ हजार १२८ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. तसेच पेण मंडळातील ४ लाख ६७ हजार ८६४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला असून २ लाख ९४ हजार ७५७ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले.

सध्या कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे प्रामुख्याने कोविड रुग्णालये, ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प व रिफीलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, पाणीपुरवठा, मोबाईल टॉवर्स, रेल्वे व अत्यावश्यक सेवेसह घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य देण्यात आले. या मध्ये ग्रामीण भागातील एकूण १४७१ पाणीपुरवठा योजना प्रभावित झाली असून ८४३ पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. कोरोनाचा उपचार करीत असलेल्या ग्रामीण भागातील ४० रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित झाला असून त्यापैकी ३५ रुग्णालयांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. उर्वरित ५ रुग्णालयांना वीजपुरवठा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून रुग्णालयांची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. ५१५ टेलीकॉम टोवरचा वीजपुरवठा खंडित झाला असून ३८७ टेलीकॉम टोवरचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

- Advertisement -

या व्यतिरिक्त, २१ उपकेंद्र, १७२ फीडर, १६७५ गावे, ६०८८ रोहित्र, ९३ उच्चदाब खांब व १७५ लघुदाब खांब प्रभावित झाले असून यातील, १९ उपकेंद्र, १२४ फीडर, ९६५ गावे, ३१५५ पूर्वपदावर करण्यात आले आहे. मुख्य अभियंता  गणेशकर यांच्या प्रभावी नियोजनामुळे व अधिकारी, कर्मचारी तसेच अजेन्सिच्या कर्मचार्यांमुळे हे काम यशस्वी झाले. मुख्य अभियंता यांनी परिमंडळ तसेच मंडल स्तरावर नियंत्रण कक्ष निर्माण केले होते. मुख्य अभियंता  सुरेश गणेशकर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन काम करीत असलेल्या अजेन्सीचे तसेच कर्मचारी व अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन केले व बाधित असलेला वीजपुरवठा लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश दिले.त्याप्रमाणे ९८ टक्के वीजपुरवठा आज पूर्ववत करण्यात येईल असे कामाचे नियोजन करण्यात आले आहे.


हेही वाचा –  Cyclone Tauktae : फळबागांचं मोठं नुकसान,पंचनामे करुन नियमानुसार मदत देणारच – अजित पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -