घरमहाराष्ट्रराहुल गांधीविरोधात दापोली भाजपा तालुका अध्यक्षांनी केली याचिका दाखल,काय आहे प्रकरण?

राहुल गांधीविरोधात दापोली भाजपा तालुका अध्यक्षांनी केली याचिका दाखल,काय आहे प्रकरण?

Subscribe

महाराष्ट्रातील रत्नागिरी जल्ह्यातील दापोली तालुक्यातील भाजपाचे दोपाली तालुका अध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी ॲड. पंकज सिंग आणि अॅड. गौतम यांच्या मार्फत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत आता वाढ होतांना दिसत आहे नुकतच ट्विटरने राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट काही काळासाठी सस्पेंड केलं होत. याबाबतची माहिती काँग्रेस ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली होती. राहुल गांधींविरोधात ट्विटरने अशी का कारवाई केली याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. पण सुत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची ओळख करणारा फोटो शेअर केल्यामुळे राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. यापूर्वीच राहुल गांधी यांचं हे ट्वीट ट्विटरने हटवले होते. आता राहुल गांधी यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे अशी महत्वपुर्ण माहिती समोर येत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण

- Advertisement -

महाराष्ट्रातील रत्नागिरी जल्ह्यातील दापोली तालुक्यातील भाजपाचे दोपाली तालुका अध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी ॲड. पंकज सिंग आणि अॅड. गौतम यांच्या मार्फत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राहुला गांधी यांच्या विरोधात मकरंद म्हादलेकर यांनी पॉक्सो ॲक्ट अंतर्गत तसेच जुवेनाइल जस्टिस ॲक्ट अंर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी दिल्ली हायकोर्टात केली आहे.कारण राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची ओळख करणारा फोटो शेअर केला होता आणि हा गंभीर अपराध आहे असे असा आरोप मकरंद म्हादलेकर यांनी केला आहे.

मकरंद म्हादलेकर यांच्या याचिकेची दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने राष्ट्रीय बाल हक्क आयोग, दिल्ली पोलीस आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवून लवकरात लवकर उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

- Advertisement -

हे हि वाचा – पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील तब्बल 19,500 कोटी रुपये

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -