घरमहाराष्ट्रनगरमध्ये सैराटचा 'थरार'; जावयाला पेटवले; गरोदर मुलीचा करुण अंत

नगरमध्ये सैराटचा ‘थरार’; जावयाला पेटवले; गरोदर मुलीचा करुण अंत

Subscribe

नगरमध्ये 'सैराट' चित्रपटाच्या कथेसारखी घटना घडली आहे. मुलीच्या घरच्यांनी जावाई आणि मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला असून जावायावर सध्या पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा ‘सैराट’ चित्रपटाच्या कथेसारखी घटना घडली आहे. आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीच्या काका आणि मामाने मुलगी आणि जावायाला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला असून मुलावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी मुलीचे काका आणि मामा यांना अटक केली असून मुलीचे वडील फरार आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

सहा महिन्यांपूर्वी रुक्मिणी रणसिंग आणि मंगेश रणसिंग यांचा प्रेम विवाह झाला. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. त्यांचा हा विवाह मुलीच्या घरच्यांना मान्य नव्हता. त्यामुळे रुक्मिनीचे घरचे नाराज झाले होते. याशिवाय त्यांच्या मनात दोन्ही पती-पत्नी यांच्या विषयी ईर्ष्या निर्माण झाली. त्यामुळे रुक्मिनीच्या घरच्यांनी गोड बोलून दोघांना मारुन टाकण्याचा डाव आखला. त्यांनी गोड बोलून रुक्मिणी आणि मंगेशचे नाते आपल्याला मान्य असल्याचे सांगितले. त्यामुळे लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांनी त्यांनी मुलगी आणि जावायाला घरी पाहुणचारासाठी बोलावले. रुक्मिणी काही दिवसांपासून माहेरी राहत होती. त्यानंतर मंगेश तिला सासरी नेण्यासाठी आला. परंतु, जेव्हा तो रुक्मिनीला घेऊन जात होता. तेव्हा तिचे वडील, काका आणि मामा यांनी मिळून मंगेशला बेदम मारहाण केली. त्यानंतर रुक्मिणी त्याच्यासोबत जायला निघाली तेव्हा त्यांनी दोघांना एका खोलीत डांबलं आणि त्याच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं. या दोघांना पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, यादरम्यान मुलीचा मृत्यू झाला तर मुलावर सध्या उपचार सुरु आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -