घरमहाराष्ट्रराजकीय स्वार्थापोटी चुकीचे, नकारात्मक निराधार दावे; वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

राजकीय स्वार्थापोटी चुकीचे, नकारात्मक निराधार दावे; वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

Subscribe

हा प्रकल्प कुणी लांबविला? स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर! अशा शब्दात फडणवीसांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे.

मुंबई :  वेदांता – फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. या मुद्द्यावरून सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर विरोधकांकडून हल्लाबोल केला जात आहे. महाराष्ट्राचे आर्थिक खच्चीकरण करण्यासाठी भाजप सरकार हा प्रकल्प गुजरातला नेत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या सर्व आरोप प्रत्यारोपांनंतर आता वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. यात अग्रवाल यांनी वेदांता फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्याची घोषणा करत हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतला असल्याचे म्हटले आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता कंपनीचे आभार मानत विरोधकांना निशाणा साधला आहे.

काय म्हणाले अनिल अग्रवाल?

वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट करत वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला का नेला याचे स्पष्टीकरण दिले आहे. ट्विटच्या माध्यमातून अग्रवाल यांनी प्रकल्पाबाबतची कंपनीची भूमिका स्पष्ट केली आहे. अनिल अग्रवाल म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन बहु – अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसाठी व्यावसायिकरित्या साइटचे मूल्यांकन करत आहे. ही वैज्ञानिक आणि आर्थिक प्रक्रिया असून ज्याला अनेक वर्षांचा कालावधी लागतो. आम्ही 2 वर्षापूर्वी याची सुरुवात केली होती. आमचा उद्देश साध्य करण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य व्यावसायिक एजन्सीच्य़ा टीमने गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांच्या सरकारशी तसेच केंद्र सरकारशी गेल्या 2 वर्षांपासून चर्चा करत आहोत. ज्याला आम्हाला चांगला पाठींबा मिळाला.

- Advertisement -

- Advertisement -

अग्रवाल यांनी पुढे म्हटले की, यात गुजरातने काही महिन्यांपूर्वी आमच्या अपेक्षा पूर्ण केल्याने हा प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय घेतला आहे, जुलैमध्ये महाराष्ट्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत या राज्याने स्पर्धात्कम ऑफरसह इतर राज्यांना मागे टाकण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु हा प्रकल्प आम्हाला एकाच ठिकाणी सुरु करायचा असल्याने व्यावसायिक आणि स्वतंत्र्य सल्ल्यानुसार आम्ही गुजरातची निवड करत आहोत. ही अब्जावधी डॉलरची दीर्घकालीन गुंतवणूक भारतीय इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला वेगळी दिशा देईल. आम्ही संपूर्ण भारतात इकोसिस्टम तयार करू तसेटच महाराष्ट्रातही गुंतवणूक करण्यास आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आमच्या गुजरात JV मध्ये एकीकरण पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र आमची गुरुकिल्ली असेल, असही अग्रवाल म्हणाले.

फडणवीसांनी विरोधकांवर साधला निशाणा

वेदांता कंपनीचे अध्यक्ष अग्रवाल यांच्या भूमिकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत आभार मानले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत. माझा या नेत्यांना प्रश्न आहे की, महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला? स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर! अशा शब्दात त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे.


ज्ञान, विज्ञान आणि तंत्रशिक्षणासाठी करणार मातृभाषा, राष्ट्रभाषेचा वापर; सुधीर मुनगंटीवारांची माहिती

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -