घरताज्या घडामोडीविधान परिषदेत 'या' तीन महत्त्वाच्या ठरावांना सर्वानुमते मान्यता

विधान परिषदेत ‘या’ तीन महत्त्वाच्या ठरावांना सर्वानुमते मान्यता

Subscribe

पावसाळी अधिवेशाचा आज सहावा आणि अखेरचा दिवस आहे. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी नामांतराचा ठराव मांडण्यात आला.

पावसाळी अधिवेशाचा आज सहावा आणि अखेरचा दिवस आहे. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी नामांतराचा ठराव मांडण्यात आला. त्यानुसार ओरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करणे, उसमानाबादचे नामांतर धाराशिव करणे आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा पाटील नाव देणे या तीन प्रस्तावाला विधानपरिषदेत सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे. (dcm devendra fadnavis Aurangabad and Osmanabad City Rename As Sambhajinagar and dharashiv and navi mumbai international airport Rename As D. B. patil in vidhanparishad)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत नामांतराचा ठराव मांडला. त्यानंतर सर्वानुमते त्याला मान्यता देण्यात आली. या ठरावानुसार आता औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्यात येणार आहे. उसमानाबाद शहराचे नामकरण धाराशिव करण्यात येणार आहेत. तसेच, नवी मुंबई विमानतळाला दि. बा पाटील यांचे नाव देण्यात येणार आहे.

- Advertisement -

औरंगाबाद आणि उसमानाबाद शहराचे नामांतराचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती. विशेष म्हणजे औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव आणि उस्मानाबाद शहराचे नावही धाराशिव करण्याचा प्रस्ताव मागील महाविकास सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या अखेरच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात निर्णय घेतला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत यासह दहा निर्णय मंजूर करण्यात आले होते. परंतु, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाळी पुकारल्यानंतर भाजपाशी युती करत राज्यात सरकार स्थापन केले. या सरकार स्थापनेनंतर महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयांना स्थगिती देणात आली होती.

सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या सहाव्या आणि अखरेच्या दिवशी नामांतराचा ठराव मांडण्यात आला आणि या ठरावाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे.

- Advertisement -

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याची शिवसेनेची जुनी मागणी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा कायमच करत आले आहेत. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे नामांतरणाची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काँग्रेसचा या निर्णयाला विरोध असल्यामुळे नामांतराचा निर्णय लांबणीवर पडला होता.

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -