Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी 'आमचं ठरलं होतं...', राज ठाकरेंच्या भेटीनंतर फडणवीसांचं स्पष्टीकरण

‘आमचं ठरलं होतं…’, राज ठाकरेंच्या भेटीनंतर फडणवीसांचं स्पष्टीकरण

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी सोमवारी रात्री उशीरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थावर भेट घेतली. या भेटीबाबतचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांना बोलताना दिले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी सोमवारी रात्री उशीरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थावर भेट घेतली. या भेटीबाबतचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांना बोलताना दिले. ‘बऱ्याच दिवसांपासून आमचे ठरले होते की एक दिवस गप्पा मारायला बसू. त्यामुळे काल मुहुर्त निघाला’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (DCM Devendra Fadnavis Talk On MNS Chief Raj Thackeray Meet)

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

- Advertisement -

“बऱ्याच दिवसांपासून आमचे ठरले होते की एक दिवस गप्पा मारायला बसू. त्यामुळे काल मुहुर्त निघाला आणि आम्ही गप्पा मारण्यासाठी बसलो होतो. असे ठरले होते की, राजकीय सोडून गप्पा करण्याचे ठरले होते”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा – Nana Patole : मोदी सरकारने 9 वर्षांत देश लुटला, भाजपाचा खरा चेहरा लोकांसमोर; नाना पटोलेंचा

- Advertisement -

नाना पटोलेंची ठाकरे-फडणवीस भेटीवर टीका

“भाजपा सातत्याने मतविभाजनाचे राजकारण करत असून आधीही मतविभाजनाचे राजकारण करत होती. त्यामुळे मतविभाजन (Division Of Vote) कसे होईल आणि त्यांना कसे सेफ केले जाईल, हा भाजपाचा (BJP) प्रयत्न असतो. त्यामुळे त्यावर फार काही बोलण्याची गरज नाही. लोकांना आता भाजपाचा खरा चेहरा समजलेला आहे”, अशा शब्दांत नाना पटोले यांनी टीका केली.

हेही वाचा – Devendra Fadnavis : सचिन तेंडुलकरबाबत तरुणांना खूप आकर्षण, फडणवीसांनी केलं कौतुक

प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)हे राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (Brand Ambassador) होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी दिली होती. त्यानुसार आज सचिन तेंडुलकर यांना स्वच्छ मुख अभियानाचा ‘स्माईल अँबॅसिडर’ म्हणून बनवण्यात आलं आहे. सचिन तेंडुलकर यांनीही ‘अँबॅसिडर’ होण्याचं मान्य केलं आहे. महाराष्ट्र शासनासोबत देखील त्यांनी करार केला आहे. हा करार पूर्णपणे निशुल्क आहे. तसेच सचिन तेंडुलकरांबाबत तरुणांना खूप आकर्षण असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सचिन तेंडुलकर यांचं कौतुक केलं आहे.

- Advertisment -