घरCORONA UPDATEकोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या मुलींची चाचणी निगेटिव्ह

कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या मुलींची चाचणी निगेटिव्ह

Subscribe

कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या मुलींची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

पालघरमधील सफाळे उसरणी येथे आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत व्यक्तीच्या दोन मुलींची देखील कोरोनाची चाचणी करण्यात आली. या दोन्ही मुलींचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या निकट सहवासात असलेल्यांचे नमुने तपासणीसाठी मुंबई येथे पाठवण्यात आले होते. यामध्ये मृत व्यक्तीच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून सध्या त्यांच्यावर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संपूर्ण परिसर सील

संबंधित व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सफाळे आणि उसरणी परिसर संपूर्ण सील बंद केल्याची माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरु आहे. तसेच संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या व्यक्तींची देखील चाचणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांचे अद्याप रिपोर्ट आलेले नाहीत.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात ८८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण रुग्ण संख्या ४९० वर पोहोचली आहे. त्यातील ५४ रुग्ण मुंबई येथील असून ९ जण अहमदनगरचे, तर ११ रुग्ण पुणे येथील आहेत. याशिवाय ९ जण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. तर २ रुग्ण औरंगाबादचे तर प्रत्येकी १ रुग्ण सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचा आहे. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४९० इतकी झाली आहे.


हेही वाचा – लॉकडाऊनचे उल्लंघन, भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -