घरमहाराष्ट्रकोरोनाच्या परिस्थितीनुसार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा

कोरोनाच्या परिस्थितीनुसार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा

Subscribe

राज्यात काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा कोरोनाच्या परिस्थितीनुसार घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. विद्यापीठाकडून संकेतस्थळावर जाहीर केलेले वेळापत्रक हे तात्पुरत्या स्वरुपाचे असून, अंतिम वेळापत्रक कोरोनाच्या परिस्थितीनुसार व सरकारच्या आदेशानुसार निश्चित करण्यात येणार असल्याचे परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

muhs circular

- Advertisement -

वैद्यकीय अभ्यासक्रमांचे उन्हाळी २०२० परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून 7 जूनला जाहीर केले होते. यामध्ये एमबीबीएस, डेंटल, बीएएमएस, बीएचएमएस याचबरोबरच बॅचलर फिजिओथेरपी, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. परंतु राज्यातील कोरोनाची वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विज्ञान विद्यापीठाने कोरोनाची जुलैमधील परिस्थिती लक्षात घेऊन अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असे परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी अंतिम वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्याशिवाय परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी सध्याचे वास्तव्याचे ठिकाण सोडू नये. अनावश्यक प्रवास टाळून वास्तव्याच्या ठिकाणीच शांतपणे परीक्षेचे तयारी करावी, विद्यार्थ्यांनी दूरध्वनी, ईमेल, मेसेजद्वारे कॉलेजांच्या संपर्कात राहावे, परीक्षेसंदर्भातील माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील, विद्यार्थ्यांनी इतर माध्यमातून येणार्‍या सूचनांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी परिपत्रकाद्वारे विद्यार्थ्यांना केले आहे.

परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक

एमबीबीएसची परीक्षा १६ ते २२ जुलै, डेंटलच्या १६ ते २३, बीएएमएसच्या १६ ते २७, बीयूएमएस १६ ते २५, बीएचएमएसची परीक्षा १६ ते २५ जुल, बेसिक बीएससी नर्सिंगची परीक्षा १६ ते १८, पी.बी. बीएससी नर्सिंगची परीक्षा १६ ते २० जुलैला होणार आहेत. त्याचप्रमाणे बॅचलर फिजिओथेरपी, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी या अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रकही विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -