घरमहाराष्ट्रमंत्रिपदासाठी शिंदे गटात चढाओढ, मराठवाड्यातील आमदारांचा शक्तिप्रदर्शनाचा धडाका

मंत्रिपदासाठी शिंदे गटात चढाओढ, मराठवाड्यातील आमदारांचा शक्तिप्रदर्शनाचा धडाका

Subscribe

राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांमध्ये जोरदार चढाओढ लागली आहे. त्यासाठी मंत्रिपदाचे इच्छुक शिंदे यांना आपली राजकीय ताकद दाखवत आहेत. मराठवाड्यातील संतोष बांगर, संजय शिरसाट यांच्या पाठोपाठ माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी शिंदे यांच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करून मंत्रिपदावर अप्रत्यक्ष दावा सांगितला. यावेळी सत्काराला उत्तर देताना शिंदे यांनी आपल्या सोबत आलेल्या एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.

माझ्यासोबत आलेल्या आमदारांची जबाबदारी मी घेतली आहे. विरोधक म्हणतात यातील एकही निवडून येणार नाही. पण मी म्हणतो एकही आमदार पडू देणार नाही. ५० पैकी एक जरी आमदार पराभूत झाला तर मी राजकारण सोडून देईन, असे शिंदे यांनी जाहीर केले. कोण जिंकणार कोण पराभूत होणार हे ठरवणारे तुम्ही कोण आहात? हे सगळं जनता ठरवत असते. मतदार ठरवत असतात, अशी खोचक टीका करताना शिंदे यांनी पुढील अडीच वर्षात या ५० आमदारांच्या मतदारसंघात विकासाचे एकही काम शिल्लक राहणार नाही, असा शब्द दिला.ॉ

- Advertisement -

आम्ही घेतलेली भूमिका सामान्यांना न्याय देणारी आहे. आमची भूमिका सर्वसामान्य लोकांना पटणारी आहे. आषाढीच्या आदल्या दिवशी मी दिल्लीहून पुण्याला उतरलो. नंतर पंढरपूरला निघालो. पुण्याच्या रस्त्याला दुतर्फा हजारो लोक स्वागतासाठी उभे होते. पंढरपुरात दहा लाखांपेक्षाही जास्त गर्दी होती. सुरक्षेच्या कारणामुळे तुम्ही गाडीच्या बाहेर येऊ नका, असे मला पोलिसांनी सांगितले. मी गाडीच्या बाहेर आलो. सर्वांना अभिवादन करत होतो. वारकही हेच माझे रक्षक आहेत, असे मी तेव्हा पोलिसांनी सांगितले. मारणाऱ्यांपेक्षा वाचवणारा मोठा असतो, असे सांगत शिंदे यांनी आपल्या सरकारला लोकांचा पाठिंबा असल्याचा दावा केला.

मी अतात्पार्यंत प्रत्येक क्षण शिवसेनेसाठी खर्च केला. मात्र, पक्षाचे अस्तित्व धोक्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेना वाचाविण्यासाठी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला. आतापर्यंत मी अनेक छोटी मोठी ऑपरेशन यशस्वी केली आहेत. मात्र, हे ऑपरेशन मोठे होते. त्यामुळे तणाव होता. सुरुवातीला तीन दिवस मला झोप लागली नाही. माझ्यासोबत आलेल्या आमदारांच्या राजकीय भवितव्याची आपल्याला चिंता होती, असे शिंदे म्हणाले.

- Advertisement -

यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही नाव न घेता टीका केली. तोंड आहे म्हणून तुम्ही काहीही बोलणार का? आम्हालाही बोलता येते. पण आम्ही पातळी सोडून बोलणार नाही. आता कामाख्या देवीने कुणाचे बळी घेतले? असा सवाल शिंदे यांनी केला. यापुढे शिवसैनिकाचे खच्चीकरण होऊ देणार नाही, त्यांच्यावरील अन्याय सहन केला जाणर नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -