घरमहाराष्ट्रउल्हासनगरः उपमहापौरांनी ४ हजार लोकांना केले अन्न-धान्य वाटप

उल्हासनगरः उपमहापौरांनी ४ हजार लोकांना केले अन्न-धान्य वाटप

Subscribe

आतापर्यंत ११०० कुटुंबे म्हणजे जवळपास ४ हजारपेक्षा जास्त लोकांना ही मदत मिळाली असून ही मदत सलग ३ दिवस राहणार सुरू

उल्हासनगरचे उपमहापौर भगवान भालेराव यांनी त्यांच्या प्रभागातील जवळपास ४ हजार लोकांना घरपोच अन्न – धान्य वाटप केले मात्र याबाबत प्रसिद्धी मिळविण्यासाठी कुठेही फोटोसेशन केले नाही. उल्हासनगर – २ येथील आझादनगर, गांधीनगर, भैय्यासाहेब आंबेडकरनगर, रमाबाई आंबेडकरनगर, हनुमान नगर व अन्य झोपडपट्टी परिसर आहे यातील बहुसंख्य परिसर हा उपमहापौर भगवान भालेराव यांच्या प्रभागात येतो, या प्रभागात मोल-मजुरी, घरकाम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. लॉक-डाऊनचा फटका त्यांच्या रोजी रोटीवर झाला आहे. त्यामुळे भालेराव व त्यांचे सहकारी हे गेल्या २ दिवसांपासून तांदूळ, डाळ, तेल याचे वाटप घरोघरी जाऊन करीत आहेत. आतापर्यंत ११०० कुटुंबे म्हणजे जवळपास ४ हजारपेक्षा जास्त लोकांना ही मदत मिळाली आहे. ही मदत सलग ३ दिवस सुरू राहणार आहे. मात्र हे मदतकार्य कोणतीही गाजावाजा न करता सुरू आहे.

या संदर्भात उपमहापौर भगवान भालेराव यांना विचारले असता ते म्हणाले की मी स्वतः एका गरीब कुटुंबात जन्मालो असून मला याची जाणीव आहे, मी केलेली मदत काही मोठी नाही पण एक मदतीचा हात दिलेला आहे, मी चार-चार जणांचे पथक बनविले आहे ते घरोघरी जाऊन अन्नधान्य वाटप करतात, कोरोना संदर्भात जी दक्षता घेण्यात येते तिचे पालन यावेळी केले जाते त्यासाठी या पथकासोबत महानगरपालिकेचे कर्मचारी देखील असतात.


हेही वाचा – Corona: वाशी APMC मार्केटची गर्दी टळेना; अखेर निर्णय झालाच!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -