Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पत्रकारांच्या गर्दीवर अजितदादा भडकले

पत्रकारांच्या गर्दीवर अजितदादा भडकले

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे उद्यापासून (सोमवार) मिनी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे. याबाबतची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली. उद्यापासून रात्री ८ वाजल्यापासून ते ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा जमावबंदी असेल, असे नवाब मलिक म्हणाले. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधून उद्यापासून कठोर निर्बंध लागू होतील याची माहिती दिली. पण यादरम्यान ते पत्रकारांच्या गर्दीवर भडकले.

अजित पवारांनी सांगितले की, मंत्रीपरिषदेची बैठकीत व्हीसीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली होती. अनेक जण रविवारी वेगवेगळ्या दौऱ्यावर असतात, त्यामुळे बहुतेक जण आपाआपल्या जिल्हातून किंवा सद्यस्थितीत असलेल्या ठिकाणाहून व्हिसीमध्ये जॉईन झाले. पुण्यातून अजित पवार आणि विश्वजित कदम उपस्थित होते. बैठकीत पुण्यात जो काही निर्णय घेण्यात आला, त्यापद्धतीने निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये अनेक जण होते. वास्तिवक उद्या रात्री आठ वाजल्यामुळे त्याची अंमलबजावणी होईल. काय अंमलबजावणी करायची, याबाबत अनेक जणांची मत जाणून घेतली आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये लॉकडाऊनदरम्यान लोकांनी भीतीमुळे तंतोतंत पालन केले. तसे काही आताच्या परिस्थिती दिसत नाही आहे. रविवार असूनही तुम्हाला कोणी सांगितलं होती, आज मिटिंग आहे. मला दुपारी मुख्यमंत्र्यांच्या फोन आला की, आज तातडीन बैठक घेण्याची गरज आहे. लगेच तुम्ही इथे १०, २० कॅमेरासह आलात ना. तुम्ही १०, २० जण आणि तुमच्यासोबतचे इतर जण, अशी लोकं जमत आहेत, असे म्हणत अजित पवार पत्रकारांच्या गर्दीवर भडकले.


हेही वाचा – Mini Lockdown: संपूर्ण लॉकडाऊन नाही, पण मिनी लॉकडाऊन लागणार – हर्ष गोयंका


- Advertisement -

 

- Advertisement -