घरमहाराष्ट्रसंजय राऊतांची अवस्था 'ना घर का, ना घाट का'; फडणवीसांची टीका

संजय राऊतांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’; फडणवीसांची टीका

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र पडणवीस यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पुढील १०० वर्ष विरोधकांची सत्ता येणार नाही, असा सल्ला पवारांनी दिला असावा, असं म्हटलं. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी बोचरी टीका केली. संजय राऊतांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाली आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगावचा दौरा केला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “संजय राऊत यांची हालत अशी आहे…म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ घ्याला पण मी त्या अर्थाने म्हणत नाही आहे. मी त्यांना चांगला संपादक मानतो. पण त्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी आहे. ते इकडचे आहेत की तिकडचे आहेत, हेच कोणाला माहित नाही आहे. त्यामुळे त्यांना काम काय उरलंय…बरं ते संपादक पण नाही आहेत, मुख्य संपादक आमच्या वहिनी आहेत. त्यामुळे त्यांची अवस्था अशी झाली आहे की सकाळी उठून बोलावं लागतं. कसं असतं ज्याच्याकडे कोणी लक्ष देत नसतं ना, त्याला लक्ष वेधून घ्यावं लागतं. त्यामुळे लक्ष वेधण्याचं काम ते करत असतात. यावर काय प्रतिक्रिया देणार,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

मागच्या नुकसानीचे पैसे मिळाले नाही असा शेतकऱ्यांचा आरोप – फडणवीस

पावसामुळे सर्व उध्वस्त झालं आहे. मागच्या नुकसानीचे पैसे मिळाले नाही असं शेतकरी म्हणत आहेत. कोकणात सरकार धावलं आमच्याकडे लक्ष दिलं नाही, असं शेतकऱ्यांनी सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच पीकविमा निकष बदलले गेले त्यामुळे लाभ होत नाही. त्यामुळे अनेकांचा पीकविमा उतरवला नाही. शेतकऱ्यांची तक्रार आहे. विमा कंपनीचे लोक पोहचत नाहीयेत, असं फडणवीस यांनी सांगितलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -