घरताज्या घडामोडीबंगालमधील हिंसाचार ही लोकशाहीची हत्या, देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर टीका

बंगालमधील हिंसाचार ही लोकशाहीची हत्या, देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर टीका

Subscribe

जे रोज सकाळी येऊन माध्यमांसमोर बोलतात तेही एकदम चुप आहेत. म्हणजे त्यांचेही कुठेतरी या बंगालच्या हिंसाचाराला समर्थन आहे का?

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकींच्या निकालानंतर हिंसाचार उफाळला आहे. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी भाजपला पराभूत करुन बंगालमधील आपली सत्ता कायम ठेवली आहे. निवडणूकींचा निकाल लागल्याच्या नंतर लगेच बंगालमध्ये काही भागात हिंसाचार सुरु झाला आहे. यामध्ये भाजप कार्यालयांची तोडफो, जाळपोळ, तसेच ११ जणांचा मृत्यूही झाला आहे. याचे खापर टीएमसीवर फोडण्यात येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बंगालमधील हिंसाचार अक्षरशः लोकशाहीची हत्या असून माणुसकीला काळीमा फासणारी व्यवस्था असल्याचे म्हटले आहे. तसेच स्वतःला पुरोगामी म्हणवणारे नेते आता एकदम चुप असल्याचे सांगत शिवसेनेवत टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगालमधली स्थिती ही अक्षरशः लोकशाहीची हत्या आहे. लोकशाहीला काळीमा फासणारी सगळी व्यवस्था त्या ठिकाणी सुरु आहे. तसेच स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम काय असते हे बांगालमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्या प्रकारे निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार केले जात आहेत. घर जाळली जातायत, मारलं जातयं, महिलांसोबत दुरव्यवहार केला जात आहे. ही अत्यंत भयानक अशा प्रकारची परिस्थिती आहे. परंतु एका गोष्टीचे आश्चर्य वाटत की स्वतःला पुरोगामी म्हणाणारा एकही नेते या बद्दल बोलायला तयार नाही यावर कोणत्याही प्रकारे निषेध करायला तयार नाही.

- Advertisement -

फडणवीसांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत जे रोज सकाळी येऊन माध्यमांसमोर बोलतात तेही एकदम चुप आहेत. म्हणजे त्यांचेही कुठेतरी या बंगालच्या हिंसाचाराला समर्थन आहे का? असा आमचा सवाल केला आहे. बंगालमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही सगळे उभे आहोत. त्यांच्या संघर्षासोबत आम्ही उभे आहोत आणि संपुर्ण देशात भारतीय जनता पार्टी त्यांच्यासोबत उभे राहील असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली जावी,तिथे हिंसाचारास थारा नसावा! निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून, हे थांबले पाहिजे बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत.अशा घटनांचे समर्थन होऊ शकते का? असा सवालही दरेकरांनी उपस्थित केला आहे. बंगालमध्ये भाजपकडे गमावण्यासारखं काहीही नव्हतं, आज जेवढे आमदार निवडून आले आहेत, त्यामागे स्थानिक कार्यकर्त्यांचे समर्पन आहे.
बंगालमध्ये वाढलेल्या जागा व मतांची वाढलेली टक्केवारी ही कार्यकर्त्यांना समर्पित आहे. परंतु ही हिंसा थांबली पाहिजे असे प्रवीण दरेकरांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -