घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीसांमुळे विजय सुखकर झाला, आठ वर्षांनी गुलाल लागताच धनंजय महाडिकांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीसांमुळे विजय सुखकर झाला, आठ वर्षांनी गुलाल लागताच धनंजय महाडिकांची प्रतिक्रिया

Subscribe

राज्यसभेच्या निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या शिरोली येथील निवासस्थानी जल्लोषी स्वागत करण्यात आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे विजय सुखकर झाला, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांमुळे विजय सुखकर झाला

आठ वर्षांनी गुलाल लागताच धनंजय महाडिकांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाडिक म्हणाले की, ही निवडणूक इतकी सोपी नव्हती, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे विजय सुखकर झाला असे म्हणावे लागेल. कारण ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली. त्यावेळी आमच्याकडे २७२ आमदारांची संख्या असल्याचे महाविकास आघाडीच्या वतीने घोषित करण्यात आले होते, त्यामुळे त्यांचे उमेदवार संजय पवार हे सहज निवडून येतील, अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यामुळे दहा ते बारा दिवसांमध्ये भाजपची सर्व टीम कार्यरत झाली आणि निकाल आमच्या बाजूने लागला, असं धनंजय महाडिक म्हणाले.

- Advertisement -

राज्यसभेची उमेदवारी मिळणे खूप कठीण काम

राज्यसभेची उमेदवारी मिळणे खूप कठीण काम आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमचे नेते आदरणीय महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गेली ३५ वर्षे महाडिक परिवार राजकारणामध्ये समाजकारणात कार्यरत आहे. आमचे सर्व कुटुंब, युवक असतील किंवा आमचे साहेबांचे सर्व बंधू असतील त्यांनी जे वलय चार जिल्ह्यांमध्ये निर्माण केलं आहे, त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टीने दखल घेतली असे म्हणावे लागेल. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला उमेदवारीची संधी दिली. परंतु देवेंद्र फडणवीसांमुळे विजय सुखकर झाला, असं महाडिक म्हणाले.

…या जन्मात तरी उतराई होणार नाही

भाजपने दिलेल्या संधीची या जन्मात तरी उतराई होणार नाही, यासाठी भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो. तसेच संपूर्ण महाडिक कुटुंब स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर धनंजय महाडिक आज कोल्हापुरात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी कुटुंबिय, भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांकडून महाडिकांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करण्यात आली. पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने निघताना कराडमध्ये रस्त्यात माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत महाडिकांची भेट झाली. त्यावेळी राजू शेट्टींनी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


हेही वाचा : पंकजा मुंडें समर्थकांनी प्रवीण दरेकरांचा ताफा अडवला, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -