घरमहाराष्ट्रधुळ्याला कंटेनर- बस अपघात १३ जागीच ठार

धुळ्याला कंटेनर- बस अपघात १३ जागीच ठार

Subscribe

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा-निमगुळ दरम्यान राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कंटेनरच्या अपघातात 13 जण ठार झाल्याची घटना घडली. या अपघातात 24 जण जखमी झाले असून, यातील चौघांची स्थिती चिंताजनक आहे. त्यांना खासगी हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. अपघातातील मृतांच्या वारसांना परिवहन महामंडळाच्या नियमाप्रमाणे प्रत्येकी 10 लाखांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन तसेच पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
औरंगाबादकडून शहादा शहराकडे जाणारी बस (एमएच-20- बीएल-3756) रविवारी (१८ ऑगस्ट) रात्री अकराच्या सुमारास दोंडाईचा नजिकच्या निमगुळ गावानजिक पोहोचली. यावेळी शहादाकडून भरधाव वेगाने आलेला (एपी-29-व्ही-7576) कंटेनर बसच्या चालकाच्या बाजूला धडकला. त्यामुळे चालकाच्या सिटपासून बसच्या मागील बाजूपर्यंतचा पत्रा कापला गेला.

बसचालकाचा जागेवरच मृत्यू झाला. अपघात होताच मोठा आवाज झाला तसेच जखमी प्रवाशांनी मदतीसाठी मोठ्याने आवाज देणे सुरू केले. यामुळे दोडाईचा भागात शेतात रहाणार्‍या काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत भ्रमणध्वनीवरुन ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधिक्षक डॉ. राजू भुजबळ, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, दोंडाईचा पोलीस ठाण्याचे निरीक्षक पाटील यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तत्पूर्वी बसमधील जखमींना दोंडाइचा येथील हॉस्पिटलात हलवले. तिघांचा जागीच मृत्यू झाल्याने त्यांना शवविच्छेदन गृहात नेण्यात आले. या अपघातात 13 जण ठार झाले आहे. मयतांमध्ये 9 पुरुष, 3 महिला व एका मुलाचा समावेश आहे.

- Advertisement -

यात बस चालक मुकेश नगीन पाटील (वय 40, रा. शहादा), शकील मोहम्मद बागवान (रा. शहादा), प्रेरणा श्रीराम वंजारी (रा. शहादा), इद्रीस नासिर मन्यार (रा. तळोदा), हस्तीक आनंद वाघचौरे (रा. ठाणे), वृषाली दिपक भावसार (रा. शहादा), संजय ताराचंद अलकारी (रा. शिरुड, ता. शहादा), सौरभ श्रीराम वंजारी (रा. शहादा), मनिषा महेद्र बागल (रा निमगुळ), तेजस जगदीश भावसार (वय 14, रा. शहादा), सुयोग बंसीलाल नाहटा (रा. शहादा), सोमनाथ धोंडु पाटील (रा. चाळीसगाव) व कंटेनरचा चालक संतोष काशिनाथ ठोंबरे (रा. टुणकी, ता. वैजापूर) यांचा मयतांमध्ये समावेश आहे.

24 जण जखमी झाले आहेत. ज्योतीबाई मोतीलाल साठे (रा. लोणखेडा ता. शहादा), योगेध मोतीलाल साठे, तुषार मोतीलाल साठे, मोतीलाल साठे, जगदीश दत्तात्रय भावसार, सुनिता जगदीश भावसार, शेख हारुण दगडु, सुरज प्रताप हरदे, सागर पांडुरंग वाघमोडे, हिराबाई निंबा चौधरी, निंबा वंजी चौधरी, दौसिंग पहाडसिंग नाईक, जाकीर दरबार पिंजारी, रईस अब्बास पिंजारी, टिल्ल्या मुरल्या पावरा, शेख शाबे अमरुदीन, बंन्सा होमर्‍या पावरा, महेंद्र बाळु बागल, कांतीलाल मुराद अलकारी, शाकीब शकील मन्सुरी, ईमरान रशीद ईराणी, मुमताज ईमरान ईरानी ,ईरम इमरान ईराणी, मोमद अली ईमरान ईराणी यांचा जखमींमध्ये समावेश आहे. दोंडाईचा व धुळयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत.

- Advertisement -

राज्य परीवहन विभागाच्या धुळे विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ, आगार व्यवस्थापक भगवान जगनोर यांनी दोंडाईचा येथील हॉस्पिटलात जखमी व मयतांची विचारपूस केली. महामंडळाच्यावतीने मयतांना प्रत्येकी दहा हजार व जखमींना प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत देण्यात आली.

शहादा शहरावर शोककळा
मयत हे शहादा शहरातील असल्याने शहरात शोककळा पसरली असून, व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवून दु:खात सहभाग नोंदवला आहे. दोंडाईचा येथील हॉस्पिटलात मयतांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी गोळा झाली होती. या नातेवाईकांनी शोक व्यक्त करताना हंबरडा फोडल्याने उपस्थितांचे डोळे देखील पाणावले. दरम्यान, रात्री अपघातानंतर मयतांची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनाच्या समोर होते. अखेर सोमवार दुपारपर्यंत सर्व मयतांची ओळख पटवून त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -