घरमहाराष्ट्रतुमच्यामुळे संजय राठोडांचं करिअर बर्बाद झालं का? पत्रकाराचा प्रश्न ऐकताच चित्रा वाघ...

तुमच्यामुळे संजय राठोडांचं करिअर बर्बाद झालं का? पत्रकाराचा प्रश्न ऐकताच चित्रा वाघ संतापल्या

Subscribe

पत्रकाराचा प्रश्न ऐकताच चित्रा वाघ संतापल्या. आपण न्यायव्यवस्था आहात का? पूजा चव्हाण प्रकरणात मी न्यायालयात गेले आहे. मला शिकवण्याची गरज नाही, अशा सुपारीबाज पत्रकारांना बोलावू नका, असं चित्रा वाघ म्हणाल्या. 

मुंबई – पुण्यातील २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याप्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी रान उठवले होते. मात्र, आता शिंदे गट-भाजपा यांची युती झाल्याने संजय राठोड यांना क्लिनचीट मिळाली आहे. यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारताच चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. तुम्ही न्यायाधीश आहात का? माझा लढा सुरू आहे, असं म्हणत, अशा पत्रकारांना बोलावू नका असं म्हणत चित्रा वाघ यांनी झापलं.

हेही वाचा पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोडांना क्लिनचिट?

- Advertisement -

संजय राठोड यांना क्लीन चीट मिळाली आहे. त्यानंतर शिंदे भाजप सरकार स्थापन झालं. संजय राठोड यांना क्लीन चिट असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. त्यामुळेच त्यांना मंत्रिमंडळात घेतले आहे. असे असताना तुमच्या आरोपांमुळे संजय राठोड यांचे आयुष्य बर्बाद झाले नाही का असा प्रश्न पत्रकाराने विचारला.


पत्रकाराचा प्रश्न ऐकताच चित्रा वाघ संतापल्या. आपण न्यायव्यवस्था आहात का? पूजा चव्हाण प्रकरणात मी न्यायालयात गेले आहे. मला शिकवण्याची गरज नाही, अशा सुपारीबाज पत्रकारांना बोलावू नका, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – संजय राठोड अडचणीत? पूजा चव्हाण प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा

काय आहे प्रकरण?

पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारीला पुण्यात इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. पूजा चव्हाण आत्महत्येला तत्कालिन वनमंत्री शिवसेनेचे यवतमाळमधील आमदार संजय राठोड यांना जबाबदार धरण्यात आलं. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरत तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर राठोड यांनी २८ फेब्रुवारीला विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एक दिवस आधी राजीनामा दिला. तथापि, पूजाच्या आई-वडिलांनी या प्रकरणी वानवडी पोलिसांकडे जबाब नोंदवला होता. मुलीच्या आत्महत्येनंतर घडलेला सर्व प्रकार हे राजकीय नाट्य होते, असा गौप्यस्फोट जबाबात त्यांनी केला होता. त्यानंतर राठोड यांना क्लिनचीट मिळणार अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, आता समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणाला नवं मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -