घरक्रीडा"सचिन तेंडुलकरला जुगाराची ॲड करताना पाहिले नाही," निलेश राणेंनी केले विशेष ट्वीट

“सचिन तेंडुलकरला जुगाराची ॲड करताना पाहिले नाही,” निलेश राणेंनी केले विशेष ट्वीट

Subscribe

आयपीएलमध्ये दाखवण्यात येणाऱ्या कमर्शियल ब्रेकमध्ये ज्या जुगाराच्या ॲड दाखवण्यात येतात, त्या ऍडमध्ये सर्वाधिक हे क्रिकेटरच आहेत, असे निलेश राणे यांच्याकडून ट्वीट करण्यात आले आहे.

आयपीएलचे नवे पर्व सुरू होऊन तीनचं दिवस झाले आहे. पण लोकांमध्ये याचे वेड पाहायला मिळत आहे. आयपीएल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता आयपीएल चर्चेत येणार आहे ती ॲडमुळे. कारण आयपीएलचे प्रक्षेपण होत असताना त्यामध्ये दाखवण्यात येणाऱ्या जुगारांच्या ऍडवर भाजपचे महाराष्ट्र सचिव निलेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आयपीएलमध्ये दाखवण्यात येणाऱ्या कमर्शियल ब्रेकमध्ये ज्या जुगाराच्या ऍड दाखवण्यात येतात, त्या ॲडमध्ये सर्वाधिक हे क्रिकेटरच आहेत, असे निलेश राणे यांच्याकडून ट्वीट करण्यात आले आहे.

निलेश राणे यांनी या कमर्शियल ॲडबाबत ट्वीट करताना लिहिले आहे की, “31 तारखेपासून IPL सुरू झालय पण कमर्शियल ब्रेक मध्ये जुगाराचे ॲड सर्वाधिक आहेत आणि ते प्रमोट करणारे ॲडमध्ये क्रिकेटरच आहेत. मी आजपर्यंत कधीही सचिन तेंडुलकरला जुगाराची किंवा दारूची ऍड करताना पाहिले नाही.” निलेश राणे यांच्या या ट्वीटला अनेक नेटकऱ्यांना सकारात्मक असे उत्तर दिले आहे.

- Advertisement -

एमपीएल, माय इलेव्हन सर्कल. ड्रीम इलेव्हन यांसारख्या कमर्शियल ॲडमध्ये विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, सौरव गांगुली यांसारखे भारतीय खेळाडू प्रमोट करताना दिसून येतात. पण या ऍडमध्ये अनेकदा लोकांना आपले पैसे देखील गमवावे लागले आहेत. त्यामुळे या ऍड करणाऱ्या क्रिकेटर्सची देखील तितकीच चूकी आहे, असे अनेकदा बोलण्यात येते.

- Advertisement -

पण या सर्व खेळाडूंमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा एक असा खेळाडू आहे, ज्याने आजतागायत अशा पद्धतीच्या कोणत्याही ॲड केलेल्या नाहीत. सचिन हा नेहमीच त्याच्या कामाने लोकांचे मन जिंकत असतो, पण त्याच्या अशा पद्धतीच्या ॲड न करण्याच्या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे. तर दुसरीकडे हल्लीचे क्रिकेटर हे नाव झाले नाही की पैसे कमवण्याच्या नादात नको त्या ऍड करतात आणि यामुळे खेळाकडे दुर्लक्ष करतात, असे मत नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.


हेही वाचा – RCB vs MI : पहिल्या सामन्यातील पराभव पचवू शकला नाही रोहित शर्मा, फलंदाजांसोबत गोलंदाजावर राग अनावर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -