घरताज्या घडामोडीKapil Sharma cheating case: दिलीप छाब्रियांच्या मुलाला CIU युनिटकडून अटक

Kapil Sharma cheating case: दिलीप छाब्रियांच्या मुलाला CIU युनिटकडून अटक

Subscribe

प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांच्या मुलाला मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटेलिजन्स युनिट (CIU) ने शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याने व्हॅनिटी व्हॅन बनवून घेण्यासाठी दिलेल्या पैशांच्या अपहार प्रकरणी ही अटक केली आहे. याआधीच मुंबई पोलीसांच्या सीआययु युनिटने दिलीप छाब्रिया यांना अटक केली होती. गेल्यावर्षी सचिन वाझे सीआययु पथकाचे प्रमुख असताना दिलीप छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती. आतापर्यंत या प्रकरणात कपिल शर्माचीही चौकशी सीआययू युनिटने केली आहे. बोनितो छाब्रिया असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे.

छाब्रिया यांच्यावर डिसी अवंती स्पोर्ट्स कारमध्ये घोटाळा केल्याचा आरोप होत. याचवेळी कपिल शर्मा यानेही सीआययु पथकात त्याची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. कपिल शर्मा याने जो व्यवहार चाब्रिया यांच्यासोबत केला होता तो चाब्रिया यांच्या मुलाच्या खात्यावर झाला होता. तसेच मुलाने या प्रकरणात अपहार केला असा आरोप कपिल शर्माने केला.

- Advertisement -

याआधीच कोट्यावधीच्या कार फायनान्सिंग घोटाळ्यात दिलीप छाब्रिया यांचा मुलगा बोनितो, त्यांची बहिण कांचन तसेच कंपनीतील दोन संचालक देखील या प्रकरणात आरोपी म्हणून घोषित करण्यात आले होते. दिलीप छाब्रिया यांच्या डीसीडीपीएल कंपनीत चोकलिंगम कथीरवन आणि सेथ्रमान सेल्वेरा यांनाही वॉंटेड म्हणून घोषित करण्यात आले होते. याआधीच जानेवारीत दिलीप छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती. सीआययूने भारतीय क्रिकेटपटू तसेच बॉलिवूड अभिनेत्यांना फसवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. छाब्रियांच्या अटकेनंतर दिलीप छाब्रिया डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड (डीसीडीपीएल) यांच्या पुणे तसेच गुरगाव येथील कार्यशाळेतही छापे टाकण्यात आले.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -