घरक्राइमDharashiv : धाराशिवमध्ये दोन गटात राडा; दगडफेकीचे कारण अज्ञात

Dharashiv : धाराशिवमध्ये दोन गटात राडा; दगडफेकीचे कारण अज्ञात

Subscribe

दोन गटात झालेल्या राड्यात पाच जण जखमी झाल्याची घटना धाराशिवमध्ये घडली. अज्ञात कारणाने दोन गट आमने सामने आल्यानंतर दगडफेक झाली असून खाजा नगर व गणेश नगर भागात हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणाव निवळला आहे.

दोन गटात झालेल्या राड्यात पाच जण जखमी झाल्याची घटना धाराशिवमध्ये घडली. अज्ञात कारणाने दोन गट आमने सामने आल्यानंतर दगडफेक झाली असून खाजा नगर व गणेश नगर भागात हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणाव निवळला आहे. तसेच, परिस्थिती पूर्वपदावर आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. (dispute between two groups in dharashiv city case has been filed against 125 people)

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव राडा प्रकरणी पोलिसांनी 125 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक देखील केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी पोलिसांनी एका यु ट्यूब चॅनलच्या पत्रकाराला देखील अटक केली आहे. त्याच्यावर जमाव भडकवल्याचा आरोप असून, अल्ताफ शेख असे त्याचे नाव आहे. धाराशिव शहरात सोमवारी रात्री दोन गटात वाद झाला. वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले. त्यामुळे दोन्ही गटातील जमाव आमने-सामने आला आणि दगडफेक झाली. या राड्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. मात्र, जमाव मोठा असल्याने अधिकचा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. यावेळी पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी आश्रूधुराच्या 3 नळकांडया फोडण्यात आल्या. त्यानंतर जमाव कमी झाला.

- Advertisement -

पोलिसांकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून, आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहेत. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दोन गटातील वादानंतर पोलिसांनी कारवाईला सुरवात केली आहे. धाराशिव शहरात झालेल्या राड्यानंतर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी 307 व इतर कलम अंतर्गत जवळपास 125 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, दगडफेकीच्या घटनेत अनेक वाहनाचे, दुकानाचे नुकसान झाले आहेत. तसेच, 4-5 लोकं जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून इतर आरोपींचा देखील शोध घेतला जात असून, त्यांना देखील अटके केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – LOK SABHA 2024 : निवडणुकीच्या रिंगणात भाजपाची ‘स्टार पॉवर’, सेलिब्रिटिंना तिकिटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -