घरताज्या घडामोडीके.पी गोसावीच्या चौकशीसाठी न्यायालयात जाणार, NCB अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांची माहिती

के.पी गोसावीच्या चौकशीसाठी न्यायालयात जाणार, NCB अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांची माहिती

Subscribe

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रूझवर कारवाई करत ड्रग्ज जप्त केले होते. या कारवाईमध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. आर्यन खानला एनसीबी कार्यालयात आणल्यावर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीला फोन करुन २५ कोटींची खंडणी मागितली असा आरोप समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच यामध्ये आरोप करणारा साईल प्रभाकर याला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. परंतु त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही असे एनसीबी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटलं आहे.

एनसीबी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधताना समीर वानखेडे यांच्या चौकशीबाबत माहिती दिली आहे. ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, एनसीबीचे दिल्लीतील ५ अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत बुधवारी दाखल झाले आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधातील आरोपांबाबत काही कागदपत्रेही जमा करण्यात आले आहेत. समीर वानखेडे यांची ४ तास चौकशी करण्यात आली असून ३ खासगी लोकांची देखील चौकशी करण्यात आली असल्याची माहिती ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली आहे.

- Advertisement -

साईलच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांना आवाहन

समीर वानखेडे यांच्यावर प्रभाकर साईलने २५ कोची खंडणीचे आरोप केले आहेत. आर्यनच्या सुटकेसाठी एनसीबी कार्यालयातून शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची खंडणी मागितली परंतु ती १८ कोटींवर झाली आणि यातील ८ कोटी समीर वानखेडे यांना भेटणार होते असा आरोप साईलने केला आहे. साईलचा जबाब या प्रकरणात महत्त्वाचा असल्यामुळे त्याच्या चौकशीसाठी मुंबई पोलीसांकडे विनंती करण्यात आली आहे. साईल मुंबई पोलिसांच्या संपर्कात असल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती करण्यात आली असल्याची माहिती ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली.

के.पी गोसावीच्या चौकशीसाठी न्यायालयात जाणार

आर्यन खान प्रकरणात पंच असलेला किरण गोसावी आता पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे किरण गोसावीच्या चौकशीसाठी न्यायालयात अर्ज करणार असल्याचे ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच केपी गोसावी आणि प्रभाकर साईलची चौकशी केल्यावर हे प्रकरण मार्गी लागेल असे एनसीबी अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Aryan Khan Bail : आर्यन खान प्रकरणात जुही चावलाची प्रतिक्रिया, म्हणाली…


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -