घरमहाराष्ट्रआरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडून डॉक्टर बेपत्ता

आरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडून डॉक्टर बेपत्ता

Subscribe

खेड तालुक्यातील आदिवासी संतप्त

ग्रामीण भागात आरोग्य सेवा सुरळीत होण्यासाठी शासन पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जातात. मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सरकारचा हेतू सफल होत नाही. याचा प्रत्यय खेड तालुक्यात आला. तालुक्यातील वाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील चार दिवसांपासून डॉक्टर येत नसल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे वाडा गावातील ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला आज टाळे ठोकले आहे.
आज वाडा गावचा बाजार असल्यामुळे पश्चिम आदिवासी भागातील अनेक नागरिक, महिला, मुले हे वाडा गावात येत असतात. त्यातील आजारी असणारे नागरिक आपल्यावर उपचार व्हावे, म्हणून सकाळपासूनच प्राथमिक आरोग्य केंद्र वाडा येथे गर्दी करून होते, मात्र गेल्या चार दिवसांपासून डॉक्टर येत नसल्याने या नागरिकांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे वाडा गावचे सरपंच रघुनाथ लांडगे, मनोहर पोखरकर यांच्यासह ग्रामस्थांनी एकत्र येत प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकून आपला निषेध व्यक्त केला.
दरम्यान तीन दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या जिल्हा आढावा बैठकीत वाडा गावात डॉक्टर उपस्थित नसल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी आरोग्य ही ईश्वर सेवा आहे, असे जिल्हा परिषद आरोग्य विभाग सभापती प्रविण माने यांनी सांगून अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

- Advertisement -

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती

खेड तालुक्यात डॉक्टरांच्या काही जागा रिक्त आहेत, परंतु प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त प्रभार नजीकच्या डॉक्टरकडे देण्याच्या स्थायी समितीच्या बैठकीत सूचना करण्यात आल्या आहेत. वाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नेमका का नाही, याची खात्री करून त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था लवकरात लवकर निश्चितपणे करण्यात येईल.
– सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. परिषद, पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -