घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रखा. कोल्हेंचा फडणवीसांना टोला; आकार टरबुजासारखा की कमळासारखा?

खा. कोल्हेंचा फडणवीसांना टोला; आकार टरबुजासारखा की कमळासारखा?

Subscribe

येवला । सध्याची ही लढाई ही अधर्माची आहे. महाभारताचा विचार करतो, तेव्हा हाच तो शकुनी मामा आहे, ज्याच्यामुळं महाभारत घडलं. आपण विरोधात असलं तर त्याला कौरव म्हणतो. त्याची संख्या कमी असते त्याला पांडव म्हणतो. त्यापलीकडे जाऊन संस्कृती अशी होती, की काही आक्रमण आलं तर कौरव पांडव भाऊ होते, ते एकत्र येऊन मुकाबला करत होते. मात्र, त्यात मिठाचा खडा कोणी टाकला तर तो शकुनी मामा याने. आता हा शकुनी मामा कोण? असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मला काही कळेना झालंय… मिठाच्या खड्याचा आकार टरबुज्यासारखा झालाय की कमळासारखा झालाय? असा सवाल करत अमोल कोल्हे यांनी मैदानात गाजवलं. मला कमळाचं फुल दिसलं, असंही कोल्हे म्हणाले. भावाभावात भांडणं लावणार्‍यांना जागा दाखवा. जनता शरद पवार यांच्या पाठिशी आहे. सत्तेसाठी त्यांच्यातील शकुनी मामा जागा झाला आणि आता फासे टाकायला लागला, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी टोले लगावले.

खासदार कोल्हे म्हणाले…..

  • जमलेली गर्दी म्हणजे विद्रोही
  • राज्यात काही दिवसांपासून कुरूक्षेत्रासारखी परिस्थिती
  • २०१९ मध्ये शरद पवारांकडे बघून लोकांनी मतदान केले.
  • वारंवार पक्ष फोडले जात आहेत
  • जनता शरद पवारांच्या पाठीशी
  • भावाभावांत भांडण लावणार्‍यांना पकडा
  • ज्यांना शरद पवारांनी सर्व दिले त्यांनीच घरावर हक्क सांगून बापाला बेघर केले
  • अनेकांना पांडुरंगच कळला नाही
  • हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है।
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -