घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजो डर गया वो मर गया : सुळेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

जो डर गया वो मर गया : सुळेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

Subscribe

येवला । सर्वसामान्य मायबाप प्रत्येकजण सांगत आहेत की, ताई तू लढ, घाबरु नको. अरे मी घाबरतच नाही. घाबरत असते तर गेले नसते का? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शोले बघितलाय ना? जो डर गया वह मर गया. मला एकाने विचारले असे कसे झाले? तुम्हाला आईसचा अर्थ समजतो का? बर्फ, त्याची स्पेलिंग म्हणजे ICE, इनकम टॅक्स, ईडी, आणि सीबीआय. जो विरोध करेल तेव्हा त्याची चौकशी. विरोध करणार्‍याला सोबत घ्यायचे आणि वॉशिंग पावडरमध्ये टाकून धुवून काढायचे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

येवला येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि बंडखोरांवर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी येवल्याच्या नागरिकांना आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्या गटाच्या आमदार आणि खासदारांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझं केंद्र सरकार आणि भाजपसोबत कांद्याच्या भावावरुन भांडण झाले आहे. जगात कांदा कमी आहे आणि भारतात जास्त कांदा पिकला. मी संसदेमध्ये आणि ट्विटरच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना 50 वेळा सांगितले की परदेशात कांदा जाऊद्या. पण भाजपने ते जाऊ दिले नाही. शेतकर्‍यांचे भाव न मिळाल्याने कंबरडे मोडले असेल तर भाजप जबाबदार आहे. शहरात टमाटरला भाव किती आहे माहिती आहे का? तुम्हाला भाव देत नाही तिकडे शहरात सर्वसामान्यांना परवत नाही. मग मधला पैसा जातो कुठे?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

- Advertisement -

महाराष्ट्र दिल्लीसमोर कधी झुकणार नाही

महाराष्ट्र दिल्लीसमोर कधी झुकला नाही आणि झुकणार नाही. मी इतके वर्ष काम करतेय. फक्त लोकसभेची एक जागा मिळाली. माझी विचारांशी निष्ठा आहे. मी पद मागितले नाही. पदं येतात जातात. केंद्रात ७० मंत्री आहेत. देशाच्या शेती मंत्र्यांचे नाव काय?, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

सुळेंनी घेतली सरोज आहेरांची भेट

येवल्याच्या सभेनंतर खा. सुप्रिया सुळे यांनी आमदार सरोज आहेर यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन तब्बेतीची चौकशी केली. सरोजताई माझी बहिण आहे. त्यामुळे मी तिच्या आणि तिच्या बाळाच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी आले. नात्यात मी राजकारण आणत नाही, असेही यावेळी सुप्रिया सुळे म्हणल्या.दरम्यान, कोणत्या गटात जावे याविषयी आपण संभ्रमीत आहोत असे काही दिवसांपूर्वीच आहेर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -