Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र साई दर्शन बंद करण्याचा शिर्डी संस्थानाचा निर्णय

साई दर्शन बंद करण्याचा शिर्डी संस्थानाचा निर्णय

Related Story

- Advertisement -

राज्यात वाढत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक दि चेन’ या धोरणांतर्गत आज सायंकाळपासून (५ एप्रिल) ते ३० एप्रिलपर्यंत शिर्डीचे साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. याबाबतची माहिती शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आहे.

साईसंस्थानची भक्तनिवास व्यवस्थाही या काळात बंद राहणार आहे. तसेच प्रसादालय आणि कॅन्टीनसुद्धा बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रसादालयात केवळ रुग्णालय आणि कोव्हिड सेंटरमधील रुग्णांसाठी जेवण बनवले जाणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली आहे. या निर्णयांबाबत झालेल्या बैठकीत मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, डॉ. मैथिली पितांबरे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, संरक्षम परदेशी तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होती.

- Advertisement -

साईसंस्थानने कोरोना संसर्ग रोखण्य़ासाठी तिसऱ्यांदा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवले आहे. दरम्यान १७ मार्च २०२० ते १५ नोव्हेंबरपासून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. तर त्यानंतर १६ नोव्हेंबर २०२० पासून ते २३ मार्चपर्यंत बंद भाविकांसाठी बंद होते. दरम्यान २७ मार्च २०२१ पासून दर्शनासाठी वेळेची मर्यादा होती. मात्र आज (५ एप्रिल) सोमवारीपासून रात्री आठ वाजल्यापासून राज्य सरकारच्या ‘ब्रेक दि चेन’ धोरणानुसार मंदिर पून्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान काही दिवस मंदिर पून्हा बंद असल्याने आता शिर्डीत भक्तींनी दर्शनासाठी धाव घेतली आहे.


 

- Advertisement -