घरताज्या घडामोडीविजेचा शॉक लागून बीडचा टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू

विजेचा शॉक लागून बीडचा टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू

Subscribe

बीडचा टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचे निधन झाले आहे. विजेचा धक्का लागून संतोषचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास संतोष मुंडेचा मृत्यू झाल्याचे समजते. संतोषच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीडचा टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचे निधन झाले आहे. विजेचा धक्का लागून संतोषचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास संतोष मुंडेचा मृत्यू झाल्याचे समजते. संतोषच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोषच्या मृत्यूवर परळीचे आमदार धनजंय मुंडे यांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला आहे. (Due To Shock Of Electricity Tiktok Star Of Beed Santosh Munde Dies)

टिकटॉक स्टार संतोष मुंडे हा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. टिकटॉकवरील संतोषचे अनेक रील्स प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे त्याच्या रीलला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत होती. मात्र, त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या चाहत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष मुंडे आणि बाबुरा मुंडे हे दोघे डीपीचा फ्यूज बदलण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. संतोष मुंडे हा बीड जिल्ह्यातील भोगलवाडी येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा होता. शेतातच तो पूर्वी टिकटॉक अॅपवर अनेकदा व्हिडिओ बनवत असतं.

संतोष मुंडे या त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जात होता. त्याचे लाखोंच्या वर फॉलोवर्स आहेत. अस्सल ग्रामीण शैलीमध्ये तो मनोरंजन करत होता. शेतामध्ये बसून तो कायमच टिकटॉकवर व्हिडीओ तयार करायचा. आपल्या अभिनयानं त्यांनी लाखो प्रेक्षकांना भुरळ पाडली होती.

- Advertisement -

धनंजय मुंडेंची पोस्ट

बीड जिल्ह्यातील भोगलवाडी (ता.धारूर) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील टिक टॉक वरून प्रसिद्धीस आलेला संतोष मुंडे व त्याच्या सोबतच्या आणखी एका तरुणाचा विजेच्या ट्रान्सफॉर्मर वरील फ्यूज जोडताना अचानक वीज प्रवाह सुरू होऊन अपघात घडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दुःखद वृत्त समजले. एका गरीब शेतकरी कुटुंबातील संतोषने ग्रामीण भाषा, सहज विनोद व देहबोलीचा कलात्मक वापर करून प्रसिद्धी मिळवली होती. दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. शेतकऱ्यांच्या पोरांना ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव आणि अपुऱ्या सुविधा यामुळे सतत बरीच अशी कामे पर्याय नसल्याने आपला जीव धोक्यात घालून स्वतः करावी लागतात. या दुर्दैवी अपघाताची जबाबदारी महावितरणने घ्यावी, या अपघातात नेमकी कुणाची चूक, हे समोर आले पाहिजे. संतोष व अपघाती मृत्यू झालेल्या अन्य तरुणाच्या कुटुंबास महावितरणने तात्काळ आर्थिक मदत द्यावी.


हेही वाचा – ज्येष्ठ वकील डॉ. बिरेंद्र सराफ यांची महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -