घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये ईडीची कारवाई : तीन जणांना अटक

नाशिकमध्ये ईडीची कारवाई : तीन जणांना अटक

Subscribe

जिल्हयात घडलेल्या स्वस्त धान्य अपहारप्रकरणी नागपूर येथील सक्तवुसली संचालनालय (ईडी) तर्फे तीन जणांना ताब्यात घेण्यात आली आहे. याप्रकरणी सिडकोतील संपत घोरपडे, अरूण घोरपडे, विश्वास घोरपडे अशी आरोपींची नावे आहेत.

सिन्नर येथून वाडीवर्‍हे मार्गे काळया बाजारात सरकारी धान्य विक्रीच्या प्रकरणात ग्रामीण पोलीसांनी छापा टाकून मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पुरवठा विभागाने ९ वर्षापुर्वी पोलीसांना पत्र देत संपत घोरपडे यांच्यासह काही संशयितांवर कारवाईसाठी पत्र दिले होते. जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ तसेच काळाबाजार प्रतिबंध व जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठयाचे परीक्षण अधिनियम १९८० च्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण पोलीस कारवाईसाठी प्रयत्नशील होते. २०१२ पासून ही कारवाई सुरू आहे. हे तिघेही संघटित गुन्हेगारी करून अवैधपणे सार्वजनिक वितरण यंत्रणेचा लाभ घेत होते. या तिघांनी अवैध व्यवहारातून १७७ कोटी रूपये गोळा केल्याचा आरोप आहे. नाशिक पोलीसांनी मकोका अंतर्गत नोंदविलेल्या एफआयआरच्या आणि चार्जशिटच्या आधारावर सक्तवसुली संचालनालय नागपुर अधिकार्‍यांनी या तिघांची सखोल चौकशी केली. या चौकशीच्या आधारावर तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकचे धान्य अपहार प्रकरण चर्चेत येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -