घरताज्या घडामोडीनाना पटोलेंचे वकील सतीश उकेंच्या घरी ईडीची धाड, फडणवीसांविरोधात केली होती याचिका

नाना पटोलेंचे वकील सतीश उकेंच्या घरी ईडीची धाड, फडणवीसांविरोधात केली होती याचिका

Subscribe

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. ईडीचे अधिकारी पहाटेपासूनच उकेंच्या घराची झाडाझडती करत आहे. त्यांच्या घराखाली सीआरपीएफ जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सतीश उके हे हायप्रोफाईल वकिलांपैकी एक आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक प्रकरण लढवली असून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक याचिका केली होती. यावरुन सतीश उके चर्चेत होते. तसेच उकेंनी नाना पटोलेंच्या बाजूने फोन टॅपिंग प्रकरणात खटला लढवला होता.

वकील सतीश उके यांच्या नागपुरातील घरी ईडीचे अधिकारी दाखल झाले असून छापेमारी सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सीएच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. यानंतर आता नाना पटोलेंचे वकील सतीश उकेंच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. सतीश उके नागपूरातील नामवंत वकील आहेत. गुरावारी सकाळी साडेसातच्या सुमारास ईडीने छापेमारी केली.

- Advertisement -

वकील सतीश उके यांच्या घरी ईडीने कारवाई कोणत्या कारणासाठी केली आहे. याबाबत अद्याप माहिती स्पष्ट झाली नाही. परंतु नागपुरमध्ये एका जमीन व्यवहाराबाबत क्राईम ब्रांचने उकेंना नोटीस बजावली होती. या प्रकरणाशी संबंधित छापेमारी असल्याची शक्यता आहे.

उकेंचं राजकीय कनेक्शन

वकील सतीश उके यांचे राजकीय वर्तुळातही मोठ्या प्रमाणात नाव चर्चेदरम्यान घेतले जाते. यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधातही भूमिका घेतली होती. दोन्ही नेते नागपुरचेच आहेत. फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने केस लढवली होती.

- Advertisement -

हेही वाचा : Babanrao Lonikar : महावितरणाच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी लोणीकरांच्या अडचणीत वाढ, ऊर्जामंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -