घरमहाराष्ट्रअनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून पीए पालांडे आणि शिंदेविरोधात आरोपपत्र दाखल

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून पीए पालांडे आणि शिंदेविरोधात आरोपपत्र दाखल

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर असलेल्या मनी लाँड्रिंगच्या आरोपांप्रकरणी (Anil Deshmukh Money Laundering Case) आज आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांचे माजी पीए संजीव पालांडे (Sanjeev Palande) आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांच्याविरोधात ईडी आज आरोपपत्र दाखल करणार आहे. विशेष ईडी न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे.

अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि सहाय्यक संजीव पालांडे यांना ईडीने पीएमएलए कायद्याखाली २६ जून रोजी अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणी ईडी दोघांविरोधात आज आरोपपत्र दाखल करणार आहे. ईडीचे अधिकारी ट्रंकभरुन पुरावे ईडी कार्यालयात घेऊन पोहोचले आहेत.

- Advertisement -

संजिव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक केल्यानंतर सुरुवातीला त्यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून ते जेलमध्ये आहेत. त्यांना अटक करून आता ६० दिवस होत आहेत. ईडीच्या कायद्यानुसार ६० दिवसात आरोपपत्र दाखल करायचं असतं. त्यानुसार पालांडे आणि शिंदे यांना अटक करुन आज ६० दिवस होत आहेत. यामुळे ईडीच्या वतीने विशेष ईडी न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे.

त्यानंतरच मी ईडीच्या समोर जाणार – देशमुख

अनिल देशमुख यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. “माझी ED च्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकूण घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी स्वत: ED च्या समोर जाणार आहे व त्यांना संपूर्ण सहकार्य करणार आहे. माझ्या संपूर्ण राजकीय-सामाजिक जीवनात मी सदैव उच्च आदर्शांचे पालन केलं आहे,” असं देशमुख यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -